माणिकराव कोकाटेंविरोधात षड्यंत्र तर नाही ना? जयंत पाटील यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 10:44 IST2025-02-27T10:44:01+5:302025-02-27T10:44:40+5:30

वीस-बावीस वर्षानंतर आणि तेही सत्तेत आल्यानंतर अशा प्रकारचे निकाल लागल्याने शंका निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. 

Isn't there a conspiracy against Manikrao Kokate? Jayant Patil's question | माणिकराव कोकाटेंविरोधात षड्यंत्र तर नाही ना? जयंत पाटील यांचा सवाल

माणिकराव कोकाटेंविरोधात षड्यंत्र तर नाही ना? जयंत पाटील यांचा सवाल

नाशिक : माणिकराव कोकाटे वीस-बावीस वर्षे आमदार होते; मात्र त्यांच्या संदर्भातील गुन्ह्याचे कोणाला फारसे माहीत नव्हते, अशावेळी अचानक निकाल लागतो आणि कोकाटे यांच्या मंत्रिपद सोडण्यापर्यंत त्यांना आणणे, या मागे कोणीतरी काही रचतंय का, असा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे.

बुधवारी (दि. २६) नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, कोकाटेच काय किंवा अन्य कोणाच्याही चुकीचे समर्थन करणार नाही. मात्र, वीस-बावीस वर्षानंतर आणि तेही सत्तेत आल्यानंतर अशा प्रकारचे निकाल लागल्याने शंका निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. 

अर्थात अलीकडे कोणाचा गुन्हा मान्य करायचा नाही, अशी सरकार चालवणाऱ्यांची भूमिका दिसते. त्यामुळे नाशिकच्या न्यायालयाने कोकाटे यांना शिक्षा दिली तरी पुढे काय होते, ते बघावे लागेल, असे जयंत पाटील म्हणाले. तसेच, पुण्यात एका एसटी बसमध्ये झालेल्या बलात्काराबाबत बोलताना त्यांनी बलात्कार करून महिलांना मारून टाकणे, अशा अत्याचाराच्या घटना खूप वाढल्या असून सरकारचा धाक नसल्याचे दिसते. 

बस डेपोत असे प्रकार होणे खूपच गंभीर आहे, सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, असे जयंत पाटील म्हणाले. याशिवाय, बीडमधील घटनेतील फरार आरोपीबद्दल बोलताना त्यांनी परदेशात जाणाऱ्या मंत्र्याचा मुलगा परदेशात जात असेल तर त्याला विमान फिरवून परत आणू शकतो तर भारताच लपलेल्या आरोपीला हुडकण्यास काय अडचण आहे, असा प्रश्न केला आहे.

१५ ऑगस्टपर्यंत तरी पालकमंत्री जाहीर करावा
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. २६ जानेवारीच्या अगोदर पालकमंत्रिपद स्थगित झाले आता १५ ऑगस्टपर्यंत तरी पालकमंत्री घोषित करावा, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

Web Title: Isn't there a conspiracy against Manikrao Kokate? Jayant Patil's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.