शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पांडवनगरीत अनियमित पाणीपुरवठा

By admin | Updated: March 26, 2015 23:24 IST

नागरिक त्रस्त : टॅँकर पाठविण्यासही पालिकेची टाळाटाळ

इंदिरानगर : प्रभाग ५४मधील पांडवनगरी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पाणीटंचाई जाणवत आहे. ऐन उन्हाळ्यात भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेने टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधल्यानंतर अरेरावीची उत्तरे दिली जात आहेत.महापालिकेच्या वतीने कितीही सुरळीत पाणीपुरवठा केल्याचा दावा केला जात असला, तरी शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत असतोच. अनेक भागात वजनदार नगरसेवकांच्या दबावानुसार पाण्याच्या वेळा बदलत असतात. सध्या तर महापालिकेने सातपूर आणि सिडको विभागात एक महिनाभर पाणीपुरवठा कमी दाबाने आणि कमी वेळ होणार असल्याचे घोषित करून टाकले आहे. इतकेच नव्हे, तर त्यासाठी महापालिकेने अधिकाऱ्यांंचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर केले आहेत. परंतु तरीही त्याचा उपयोग होत नाही. पांडवनगरी परिसरातील नागरिकांना हाच अनुभव येत आहे.पांडवनगरी परिसरात सध्या सुमारे सहाशे फ्लॅट्सची वसाहत आहे. त्यात बहुतेक सरकारी कर्मचारी आहेत. सुमारे पंधरा वर्षांपासून या वसाहतीला पाण्याचा प्रश्न सतावत आहे. अनेकदा आंदोलने करूनही उपयोग झालेला नाही. गेल्या आठ दिवसांपासून पाणीप्रश्न उग्र झाला आहे. अल्प दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना गरजेइतकेही पाणी मिळत नाही. त्यामुळे नोकरदारवर्गाचे हाल होत आहेत. महापालिकेने जाहीर केलेल्या भ्रमणध्वनीवर टॅँकर पाठविण्यासाठी संपर्क साधल्यानंतर त्यांनी दुसऱ्या अधिकाऱ्याचा क्रमांक देणे आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांनी ‘माझा संबंध नाही, माझा नंबर कोणी दिला’ अशी उर्मट उत्तरे देतात आणि आपले नावही सांगत नसल्याची तक्रार आहे. (वार्ताहर)