शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीतील दंगलखोरांचा पोलिसांकडून तपास सुरू

By admin | Updated: February 25, 2017 23:42 IST

ठाकरे स्टेडिअम : दंगलीचे व्हिडिओ चित्रीकरण; फुटेजची तपासणी

नाशिक : हिरावाडीतील मीनाताई ठाकरे स्टेडिअममध्ये सुरू असलेल्या प्रभाग क्रमांक तीनच्या मतमोजणीप्रसंगी इव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप करून मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करून रस्त्यावरील उभ्या दुचाकींची तोडफोड करणाऱ्या दंगलखोरांचा व्हिडिओ चित्रीकरणाच्या आधारे पंचवटी पोलिसांनी शोध सुरू केला आहे़गुरुवारी (दि़२३) मतमोजणीच्या दिवशी हिरावाडीतील ठाकरे स्टेडिअमबाहेर दंगलखोरांनी घातलेल्या गोंधळाची मोबाइल क्लिप पंचवटी पोलिसांना मिळाली आहे़ या मोबाइल क्लिपच्या आधारे पोलिसांनी दंगल घडवून आणण्यास कारणीभूत असणाऱ्या सुमारे ३० ते ३५ संशयितांवर गुन्हे दाखल केले असून, त्यापैकी संशयित विशाल कदम, अमोल कदम, हेमंत अहिरराव, कुंदन वैद्य यांना अटक केली आहे़ न्यायालयाने या संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली आहे़  ठाकरे स्टेडिअममध्ये मतमोजणी सुरू असताना ईव्हीएम मशीनमध्ये घोळ केल्याचा आरोप करीत संतप्त जमावाने संकुलाबाहेर तीव्र घोषणाबाजी करून पोलिसांवर दगडफेक केली़ या दगडफेकीत पोलीस वाहनांसह दुचाकींचेही नुकसान तर झालेच शिवाय सात पोलीस कर्मचारीही जखमी झाले़ तसेच प्रक्षुब्ध जमावास पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत तीन वेळा गोळीबारही करावा लागाला़ याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दंगल घडवून आणणे, बेदम मारहाण, शासकीय कामात अडथळा यांसह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला  आहे़ मतमोजणीच्या वेळी स्टेडिअमबाहेर उसळलेल्या दंगलीचे काही नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये चित्रीकरण केले होते़ या चित्रीकरणाच्या व्हिडिओ क्लिप तसेच संशयितांचे फोटो पोलिसांच्या हाती लागले असून, त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे कर्मचाऱ्यांनी शोध सुरू केला आहे़ (प्रतिनिधी)