शहरं
Join us  
Trending Stories
1
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
2
Marathi News LIVE: सीमेवर कुंपण घालण्यासाठी बीएसएफला जमीन देण्यास पश्चिम बंगाल सरकारची मान्यता
3
हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
4
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
5
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
6
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
7
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
8
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
9
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
10
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
11
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
12
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
13
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
14
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
15
Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
16
क्रेडिट कार्डने पैसे वाचवता येतात का? करा हजारो रुपयांची बचत; कोणते कार्ड नेमके कशासाठी वापरायचे?
17
शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
18
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
19
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
20
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सदन कारभाराची चौकशी करा : ठाकरे

By admin | Updated: July 25, 2014 00:28 IST

महाराष्ट्र सदन कारभाराची चौकशी करा : ठाकरे

नाशिक : महाराष्ट्र सदनात घडलेला प्रकार कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने नसल्याचा पुनरुच्चार करीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत गेल्यानंतर मराठी कलावंतांनाही उतरू न देणाऱ्या महाराष्ट्र सदनाच्या कारभाराचीच चौकशी करा, अशी मागणी केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागाच्या आढावा बैठकीसाठी आलेले उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. महाराष्ट्र सदन आणि नाशिकचे नाते आहे, असा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा थेट नामोल्लेख न करता ठाकरे यांनी सांगून या सदनाच्या बांधकामाबाबत भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे सदनाचे ठेकेदार कोण होते, या
मुद्द्यांचीही चौकशी पुढे झालीच पाहिजे.
महाराष्ट्र सदनात मध्यंतरी मराठी कलावंतांनाही उतरू देण्यास नकार देण्यात आला होता. त्यामुळे मराठी माणसाला महाराष्ट्र सदनातच अशी वागणूक मिळत असेल, तर महाराष्ट्र सदनाऐवजी लॉजिंग-बोर्डिंग नाव द्या, असा उपरोधीक सल्लाही ठाकरे यांनी दिला. तसेच सदनातील या कारभाराबद्दल आयुक्त बिपिन मलिक यांच्यावर कारवाई करावी, असेही ते म्हणाले.
दरम्यान, धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात पूर्वीच्या राजपत्रात चूक झाली आहे. त्यात ध चा मा झाला असून, ही चूक सुधारली गेली पाहिजे. या समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळवून देऊ, असेही ठाकरे
म्हणाले.
यावेळी माजी मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्र गावित, तसेच धुळ्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नगरसेवक सतीश महाले यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन धागा बांधून त्यांचे स्वागत केले.