शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

फायबर आॅप्टीक तुटल्याने जुन्या आग्रारोडवर इंटरनेट सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:54 AM

सर्वसामान्य नागरिकांसाठी रोगापेक्षा इलाज भयंकर ठरलेल्या स्मार्ट रोडमुळे त्रास कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. मंगळवारी (दि. १८) जुन्या आग्रारोडवर स्टेट बॅँकेच्या समोर दुपारी हा प्रकार घडल्यानंतर सर्व इंटरनेट आणि अन्य सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत.

नाशिक : सर्वसामान्य नागरिकांसाठी रोगापेक्षा इलाज भयंकर ठरलेल्या स्मार्ट रोडमुळे त्रास कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. मंगळवारी (दि. १८) जुन्या आग्रारोडवर स्टेट बॅँकेच्या समोर दुपारी हा प्रकार घडल्यानंतर सर्व इंटरनेट आणि अन्य सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत.  नाशिक शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून होत असलेल्या त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ करण्यासाठी पथदर्शी स्मार्ट रोड करण्यात येत आहेत. या मार्गावरील शासकीय कार्यालये, शाळा, व्यावसायिक आस्थापना तसेच बॅँका या सर्वांचे काय होईल, याचा विचार न करताच रस्त्याचे काम करण्यात येतअसून, त्यामुळे वाहतुकीचा तर बोजवारा उडाला आहेच शिवाय  अन्य कामांतदेखील व्यत्यय येत आहे.  मंगळवारी (दि.१८) दुपारी आदर्श शाळा ते स्टेट बॅँकेच्या दरम्यान स्मार्ट रोडचे काम करणाऱ्यांकडून बीएसएनलची फायबर आॅप्टीक तुटली त्यामुळे या भागातील इंटरनेट आणि दूरध्वनी सेवाच ठप्प झाली. स्टेट बॅँकेकडे पर्यायी व्यवस्था असल्याने काही प्रमाणात काम सुरू होते. मात्र अन्य सर्व आस्थापनांचे काम ठप्प झाले. बीएसएनएलच्या कर्मचाºयांनी सायंकाळी या ठिकाणी येऊन फायबर आॅप्टीक जोडण्याचे प्रयत्न केले, परंतु उपयोग झाला नाही. त्यातच रात्र झाल्याने आता बुधवारी (दि.१९) ते काम करणार आहेत, परंतु त्यामुळे परिसरातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.गेल्या महिन्याच्या अखेरीस अशाच प्रकारे अशोकस्तंभ येथे स्मार्ट रोडच्या कामातच अशाप्रकारे फायबर आॅप्टीक तुटल्याने अशोकस्तंभ, मेहेर, महात्मा गांधीरोड आणि वकीलवाडी परिसरातील सेवा ठप्प झाली होती. तीदेखील दुसºया दिवशी सुरू झाली होती. अशाप्रकारे अडचणी येऊ शकतील याची कोणतीही दक्षता न घेताच काम सुरू असल्याने दुसºयांदा हा प्रकार घडला असून, परिसरातील नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.स्मार्ट रोडचे काम करताना यंत्रणेने या भागातील नागरिक आणि व्यावसायिकांवर काय परिणाम होतील याची पूर्वदक्षता घेणे आवश्यक होते, परंतु असे कोणतेही नियोजन कंपनीकडे दिसत नाही. मंगळवारी दुपारी महागडी फायबर आॅप्टीक तुटल्याने समस्या निर्माण झाली आहे. लॅबचे सर्व काम ठप्प झाले आहे.  - डॉ. नारायण विंचूरकर, वैद्यकीय व्यावसायिकस्मार्ट सिटीचा प्रकाश केव्हा पडणार?स्मार्ट रोडच्या अवघ्या १.१ किलोमीटर रस्त्यासाठी १७ कोटी रुपयांचा खर्च महापालिकेची स्मार्ट सिटी करीत आहे. इतकेच नव्हे तर हा खर्च आणखी वाढणार असून, त्याचे प्राकलन तयार केले जात आहे; परंतु रस्ते करताना काय काळजी घ्यावी याचे ज्ञानही अधिकाºयांना नाही. महापालिकेने पावसाळी गटार योजनेसाठी शहरभर खोदकाम केले तेव्हा अशाप्रकारच्या केबल समस्या सोडविण्यासाठी खास कंपनी नियुक्त केली होती. परंतु स्मार्ट सिटीत असे कोणतेही नियोजन नसून कंपनीच्या डोक्यात प्रकाश केव्हा पडणार, असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाInternetइंटरनेटNashikनाशिकSmart Cityस्मार्ट सिटी