शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

परस्पर पॅनलची निर्मिती

By admin | Updated: October 23, 2016 00:10 IST

इच्छुकांकडून प्रचारास सुरुवात : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उपक्रम

नाशिक : महापालिका निवडणुकीला सुमारे चार महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना आणि अद्याप राजकीय पक्षस्तरावर युती -आघाडीचे चित्र स्पष्ट झालेले नसताना इच्छुकांनी परस्पर आपापल्या प्रभागात पॅनलची निर्मिती करत एकत्रितरीत्या प्रचारास सुरुवात केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पॅनलमार्फतच एकत्रितरीत्या विविध उपक्रमांचेही आयोजन केले जात आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर प्रभागातील चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीत यंदा चार सदस्यीय प्रभागरचना आहे. ३१ पैकी २९ प्रभागात चार सदस्य, तर दोन प्रभागांमध्ये तीन सदस्य असणार आहेत. चार सदस्यीय रचनेत आपल्या सोबत कोण-कोण असेल, कोणाला सोबत घेतले तर निवडणूक सोपी जाईल, कोणत्या उमेदवाराचा कोणत्या भागात मतसंख्या वाढण्यास मदत होईल या दृष्टीने अनेकांनी चाचपणी सुरू केली आहे, तर काही इच्छुक उमेदवारांनी पक्षपातळीवर घोषणा होण्यापूर्वीच परस्पर पॅनल निर्मिती करत आपणच पक्षामार्फत निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे दर्शविले आहे. काही प्रभागात तिघांनी, तर काही प्रभागात चौघांनी एकत्र येत पोस्टरबाजीही चालविली आहे. सध्या दिवाळीचा माहौल असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी काही इच्छुकांनी एकत्रितपणे पोस्टरबाजी करत विविध उपक्रमांचेही आयोजन केले आहे. संबंधित इच्छुकांनी परस्पर पॅनल जाहीर करत अप्रत्यक्षपणे प्रचाराला प्रारंभ केल्याने अन्य इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काहींनी तर याबाबत हरकत घेत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याची तयारी चालविली आहे. (प्रतिनिधी)