शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणादायी : शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कुटुंबे भारावली दिंडोरीत आजी, माजी सैनिकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:14 IST

दिंडोरी : येथील अ‍ॅचिव्हर्स ग्रुप व जनता इंग्लिश स्कूलच्या वतीने हुतात्मा दिन शहीद दिन म्हणून साजरा करण्यात आला. तालुक्यातील शहीद जवान यशवंत ढाकणे (तळेगाव) व संदीप ठोक (सिन्नर) यांच्या आई-वडिलांचा तसेच माजी सैनिक व सध्या देशसेवेत कार्यरत असलेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देप्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनविद्यार्थी यांची रॅली

दिंडोरी : येथील अ‍ॅचिव्हर्स ग्रुप व जनता इंग्लिश स्कूलच्या वतीने हुतात्मा दिन शहीद दिन म्हणून साजरा करण्यात आला. तालुक्यातील शहीद जवान यशवंत ढाकणे (तळेगाव) व संदीप ठोक (सिन्नर) यांच्या आई-वडिलांचा तसेच माजी सैनिक व सध्या देशसेवेत कार्यरत असलेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक तथा प्राचार्य सी. बी. पवार उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले, अ‍ॅचिव्हर्स ग्रुपने युवकांना मार्गदर्शन करून देशसेवेसाठी प्रेरणा द्यावी व युवकांना सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, महात्मा गांधी व शहीद यशवंत ढाकणे यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, कृउबा समिती उपसभापती अनिल देशमुख, डॉ. विलास देशमुख, शहीद ढाकणे यांचे वडील अर्जुन ढाकणे, शहीद ठोक यांचे वडील सोमनाथ ठोक, दिंडोरी तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शंकरराव कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी देशसेवेसाठी प्राणाची आहुती दिलेल्या व शहीद झालेल्या सैनिकांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. ग्रुपच्या वतीने शहीद दिनानिमित्त शहरातून माजी सैनिक, ग्रुपचे विद्यार्थी व शाळेचे विद्यार्थी यांची रॅली काढण्यात आली. रॅलीच्या सर्वात पुढे चालणाºया जीपवर तिरंगी झेंडा लावण्यात येऊन देशभक्तीपर गीते लावण्यात आले होते. ही रॅली सर्वांचे आकर्षण ठरली. संतोष कथार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी धनंजय जाधव, सागर वानखेडे, सिद्धार्थ पगारे, अक्षय चारोस्कर उपस्थित होते. महेश खुळे यांनी सूत्रसंचालन केले. सागर वानखेडे यांनी आभार मानले.
रांगोळी सर्वांचे आकर्षण
अ‍ॅचिव्हर्स ग्रुपच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते अर्जुन ढाकणे व सोमनाथ ठोक यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी तालुक्यातील २१ माजी सैनिक, देशातील विविध राज्यांत देशसेवेचे कर्तव्य बजावत असणाºया ५५ सैनिकांच्या कुटुंबांचा व सैनिकांचा ग्रुपच्या वतीने रोप देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाने सैनिकी कुटुंबे भारावून गेली होती. ग्रुपच्या वतीने मैदानावर सैनिकांच्या बंदुकीची प्रतिकृती रेखाटली होती, ती रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरली.