शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
3
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
4
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
5
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
6
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
7
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
8
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
9
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
10
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
11
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
12
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
13
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
14
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
15
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
16
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
17
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
18
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
19
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
20
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
Daily Top 2Weekly Top 5

वंध्यत्व ही आजची सामाजिक समस्या

By admin | Updated: September 7, 2016 00:38 IST

नरहरी मळगावकर : ‘मला बाळ हवंय’ कार्यक्र म उत्साहात

 नाशिक : चुकीची जीवनशैली, कामातील ताण-तणाव यामुळे वैवाहिक जीवनात समस्या उद्भवत असून, अनेक जोडप्यांमध्ये वंध्यत्व वाढीला लागले आहे. लग्नानंतर अनेकवर्ष मूलबाळ होत नसल्याने अशा जोडप्यांची समाजात हेटाळणी होते. वंध्यत्व या सामाजिक समस्येवर ‘टेस्ट ट्युब बेबी’ या अत्याधुनिक तंत्रज्ञामुळे निश्चितच मदत होईल, असे मत डॉ. नरहरी मळगावकर यांनी केले.शनिवारी (दि. ३) महाकवी कालिदास कलामंदिर येथे संस्कारवाणी युवक मंडळ आणि हितगुज महिला मंडळ यांच्या वतीने अयोजित ‘मला बाळ हवंय’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. नरहरी मळगावकर यांनी टेस्ट ट्युब बेबी या तंत्रज्ञानातील आक्षेप आणि गैरसमज याबाबत उपस्थितांना माहिती देताना टेस्ट ट्युब प्रणालीतून अपत्यप्राप्ती कशी होते याबाबतही मार्गदर्शन केले तसेच उपस्थित प्रेक्षकांनी विचारलेल्या शंकांचेही मळगावर यांनी निरसन केले.डॉ.सोनाली मळगावकर यांनी वंध्यत्वाचे कारणे नमूद करताना अनेक जोडप्यांचे उशिरा विवाह झाल्याने तसेच करिअरच्या दबावामुळे कालांतराने संसारसुखाचा विसर पडत गेल्यावर वंध्यत्वाची लक्षणे दिसून येत असल्याचे सांगितले. लग्नानंतर अनेक जोडप्यांना कार्यक्रमांना बोलावणेदेखील टाळले जाते तसेच त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याकडे लक्ष वेधले. डॉ. सोनाली मळगावकर यांनी यावेळी वैद्यकीय चाचण्या आणि सकारात्मक विचारसरणी हे सूत्राचे पालन करण्याचे आवाहन केले.‘विवाह संस्कार’ या विषयावर जिल्हा सत्र न्यायालयाच्या सहायक अधीक्षक मंजूषा कोठावदे यांनी मार्गदर्शन करताना पती-पत्नीतील वैवाहिक वाद त्यांच्या मुलांच्या आयुष्यावर खुप दूरगामी परिणाम करतात. त्यामुळे जोडप्यांचे वाद हे लहान मुलांसमोर शक्यतो होऊ नयेत. तसेच ताणतणाव निवारणासाठी जोडप्यांनी संसारातील आनंददायी बाबी शोधून त्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमादरम्यान ‘तारे जमीन पर’सांस्कृतिक कार्यक्रमाचेदेखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माचे संयोजन जितेंद्र येवले, सूत्रसंचालन रसिका वाणी, मीनल वाणी, तर आभार शरद वाणी यांनी केले. (प्रतिनिधी)