शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वाढती गुन्हेगारी की, ठेकेदाराचे भय?

By admin | Updated: February 12, 2015 00:49 IST

पोलीस आयुक्तालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी टाळले

नाशिक : होणार, होणार म्हणून गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पोलीस आयुक्तालयाच्या अद्ययावत इमारतीचे उद्घाटन पुन्हा लांबणीवर पडले असून, इमारतीपासून हाकेच्या अंतरावर येऊनदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याकडे पाठ फिरविल्याने पोलीस वर्तुळातच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या गृहखात्याचा पर्यायाने पोलीस यंत्रणेचा धाक सुटल्याने शहरात वाढलेल्या गुन्हेगारीवर नाराज होऊन मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन टाळल्याचा अर्थ काढला जात असतानाच, बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना ‘मद्यपार्टी’च्या निमित्ताने टक्केवारी देणाऱ्या ठेकेदाराने बांधलेल्या इमारतीचा मुख्यमंत्र्यांनी धसका घेतल्याचेही आता बोलले जात आहे. नाशिकच्या पोलीस यंत्रणेवर यापूर्वीच मुख्यमंत्र्यांची मर्जी खपा झाली असून, त्यासाठी कुंभमेळ्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे निमित्त घडले आहे. वारंवार बजावूनही भाड्यानेच कॅमेरे बसविण्याचा पोलीस यंत्रणेचा अट्टहासाबाबत मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे शंकाही घेतलेली असताना त्यांच्या उपस्थितीतच पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्याचा घाट पोलीस प्रमुखांनी घातल्याची बाब बहुधा मुख्यमंत्र्यांना रूचलेली नसल्याचेही आता बोलले जात आहे. त्यामुळेच की काय महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या दीक्षांत समारंभास उपस्थित राहण्यासाठी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल दोन तास हजेरी लावली व पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे पूर्वनियोजीत उद्घाटन न करता हेलिकॉप्टरने रवानाही झाले. विशेष म्हणजे शरणपूररोडवरील पोलीस परेड मैदानावर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरले व तेथूनच ते रवाना झाले. हेलिपॅड ते पोलीस आयुक्तालयाची नूतन इमारत यातील अंतर जेमतेम दशशतक मीटर म्हणजेच हजार मीटरच असताना मुख्यमंत्र्यांनी त्याकडे पाठ फिरविल्याने केलेली तयारी वाया गेली आहे. शहरातील गुन्हेगार मोकाट सुटले असून, गुन्हेगारी कारवायांनी नागरिक त्रस्त झालेले आहेत. दिवसाढवळ्या खून, व्यापाऱ्यांची लूट, धाडसी चोऱ्या-घरफोड्यांनी लाखोंचा ऐवज लुटला जात आहे. महिलांचे मंगळसूत्र असुरक्षित होऊन आर्थिक फसवणुकीच्या घटना पाहता पोलिसांचा धाक कमी झाल्याचा अर्थ काढला जात आहे. (प्रतिनिधी)