शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

टमाटा बाजारभावात सुधारणा; आवक कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:38 AM

तीन महिन्यांपूर्वी टमाटा मालाची प्रचंड आवक वाढल्याने बाजारभाव पूर्णपणे गडगडले होते. टमाटा मालाला दोन रुपये प्रति किलो असा दर मिळत असल्याने लागवडीसाठी लागणारा खर्च तसेच दळणवळणाचा खर्चही सुटत नसल्याने अनेक टमाटा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील टमाटा जनावरांसाठी सोडून दिला होता, तर काहींनी टमाटा पीक काढून टाकले होते.

पंचवटी : तीन महिन्यांपूर्वी टमाटा मालाची प्रचंड आवक वाढल्याने बाजारभाव पूर्णपणे गडगडले होते. टमाटा मालाला दोन रुपये प्रति किलो असा दर मिळत असल्याने लागवडीसाठी लागणारा खर्च तसेच दळणवळणाचा खर्चही सुटत नसल्याने अनेक टमाटा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील टमाटा जनावरांसाठी सोडून दिला होता, तर काहींनी टमाटा पीक काढून टाकले होते. सध्या नाशिक बाजार समितीत विक्रीसाठी येणाºया टमाटा मालाची आवक कमी प्रमाणात असून, मागणी असल्याने सध्या तरी टमाटा मालाचे बाजारभाव टिकून आहेत. नाशिक बाजार समितीत विक्रीसाठी येणाºया टमाटा मालाला दर्जानुसार प्रति किलो २० रुपये असा बाजारभाव मिळत आहे.  गेल्या मार्च महिन्यात टमाटा मालाची आवक वाढली होती त्यातच ज्या त्या बाजारपेठेत स्थानिक टमाटा माल दाखल होत असल्याने टमाटा २ रुपये प्रति किलो दराने विक्री होत होता. याशिवाय नाशिकच्या बाजार समितीतून पाकिस्तान, बांग्लादेशात मोठ्या प्रमाणात टमाटा मालाची निर्यातही केली जायची मात्र भारत-पाक सीमेवर सुरू असलेल्या वादामुळे बॉर्डर बंद असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून बॉर्डर बंद होती त्यामुळे परदेशातील निर्यात पूर्णपणे थांबली होती.  गेल्या पंधरवड्यापासून टमाटा मालाची आवक कमी होत चालल्याने बाजारभावात बºयापैकी सुधारणा झाली आहे. टमाटा मालाला (२०) किलो जाळीसाठी ४०० ते ४५० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. टमाटा मालाला बाजारभाव नसल्याने अनेक शेतकºयांनी टमाटा पिकाकडे दुर्लक्ष केल्याने पीक नाश पावले होते, तर ज्यांनी टमाटा पिकाचे उत्पादन सुरू ठेवले होते त्यांना आजमितीस चांगला बाजारभाव मिळत आहे. बाजार समितीत आवक कमी झाल्याने तसेच मागणी असल्याने टमाटा मुंबई, गुजरात यांसह अन्य भागांत रवाना केला जात आहे. नाशिक बाजार समितीत टमाटा २० रुपये किलो, तर पुणे नारायणगाव या भागांत टमाटा मालाची आवक जास्त असल्याने टमाट्याला १३ ते १५ रुपये प्रति किलो असा बाजारभाव मिळत आहे.टमाट्याला बॉर्डर बंदचनाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून पाकिस्तान तसेच बांग्लादेशात टमाटा मालाची आवक केली जाते. मात्र भारत- पाक सीमेवर अधूनमधून सुरू असलेल्या तणावाच्या वातावरणामुळे गेल्या वर्षी १५ आॅगस्टपासून बॉर्डर बंदच असल्याने नाशिकमधून जाणाºया टमाटा मालाची निर्यात पूर्णपणे थांबलेली आहे. आगामी कालावधीत बॉर्डर सुरू झाली तर टमाट्याचे बाजारभाव आणखी तेजित येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड