शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक पक्ष व स्थानिक उमेदवारांकडेही दुर्लक्ष

By admin | Updated: October 20, 2014 00:14 IST

पारंपरिक पक्ष व स्थानिक उमेदवारांकडेही दुर्लक्ष

 

नाशिक : नाशिक मध्य मतदारसंघामधील जुने नाशिक, वडाळागाव परिसरात दलित, मुस्लीम मतदारांचे प्रमाण इतर मतदारसंघांच्या तुलनेत अधिक असल्याचे मानले जाते. दलित-मुस्लीम हा वर्ग नेहमीच कॉँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाबरोबर जातो असे समीकरण आजपर्यंत राजकीय वर्तुळात लावले गेले; मात्र यंदाच्या निवडणुकीत मुस्लीम व दलित मतदारांनी पारंपरिक राजकीय पक्ष सोडण्याबरोबरच जुन्या नाशकातून निवडणूक रिंगणात उतरलेले कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थानिक उमेदवारांकडेही पाठ फिरविली. गेल्या अनेक वर्षांपासून जुने नाशिक परिसराकडे गावठाण म्हणून सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले. मूलभूत सोयीसुविधा मिळविण्यासाठी आजही येथील नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याचे आव्हान नाशिक मध्य मतदारसंघातील भाजपाच्या विजयी उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांच्यासमोर राहणार आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत या भागातील मतदारांनी कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडे दुर्लक्ष करत मनसेच्या इंजिनवर स्वार होणे पसंत केले होते; मात्र गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये मध्य नाशिक मतदारसंघातील जुने नाशिक, वडाळागाव परिसराचा पाहिजे त्या प्रमाणात विकास घडून आला नाही तसेच येथे आवश्यक त्या सोयीसुविधादेखील उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. मनसेची सत्ता येऊनही डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाचादेखील कायापालट होऊ शकला नाही. त्यामुळे मतदारांनी बदल घडवून आणत कॉँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांबरोबरच मनसेवरदेखील विश्वास दाखविणे पसंत केले नाही व भाजपा पक्षाच्या महिला उमेदवाराच्या बाजूने कौल दिला. एकूणच या मतदारसंघाच्या लागलेल्या निकालामध्ये या भागातील मतदान निर्णायक ठरले आहे. (प्रतिनिधी)