नाशिक कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली किंवा कुणी बुडालं तर गोदाघाटावरच 'ऑनसाइट आयसीयू', काय आहे प्लॅनिंग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 18:51 IST2026-02-12T18:49:45+5:302026-02-12T18:51:02+5:30

नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी वेगाने तयारी सुरू आहे. देश आणि जगभरातून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच्या सेवांचेही नियोजन केले जात आहे. 

If there is a stampede or someone drowns at the Nashik Kumbh Mela, there will be an 'onsite ICU' at Godaghat itself, what is the planning? | नाशिक कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली किंवा कुणी बुडालं तर गोदाघाटावरच 'ऑनसाइट आयसीयू', काय आहे प्लॅनिंग?

नाशिक कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली किंवा कुणी बुडालं तर गोदाघाटावरच 'ऑनसाइट आयसीयू', काय आहे प्लॅनिंग?

नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने कुंभमेळ्यासाठी जोरदार नियोजन सुरू असून, अमृत स्नानाच्या दिवसांत आपत्कालीन स्थितीसाठी नदी घाटाशेजारीच ऑनसाइट आयसीयू असणार आहे. त्याचप्रमाणे घाटांवर, तसेच भाविक आल्यानंतर त्यांच्या पार्किंगच्या ठिकाणी आणि होल्डिंग एरियामध्ये एकूण ५१ तंबू दवाखाने असणार आहेत.

महापालिकेने कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाचा आराखडा तयार केला असून, प्रशासनाने तो कुंभमेळा प्राधीकरणाला सादर केला आहे. त्यात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कुंभमेळा प्रामुख्याने गोदाकाठी भरणार असल्याने याठिकाणी आरोग्य सुविधा देण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. अर्थात, गोदाकाठी सुविधा देण्यासाठी अधिक नियोजन करण्यासाठी नदीकाठी घाट कोठे बांधणार, हेच निश्चित नसल्याने अद्याप काही सुविधांचे प्रयोजन बाकी आहे. काही घाट नाशिक महपाालिका, तर काही घाट जलसंपदा विभागदेखील बांधणार आहे. तथापि, आरोग्य विभागाने आराखडा तयार केला आहे.

गोदाकाठी चेंगराचेंगरी झाली किंवा नदीपात्रात कोणी बुडाला तर अशा व्यक्तीला तातडीचे उपचार मिळावेत यासाठी गोदाकाठी दवाखान्यांबरोबरच ऑन साइट आयसीयू असणार आहेत. त्याची मोठी मदत भाविकांना होणार आहे. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी ही माहिती दिली.

२ तपोवनात येथे शंभर बेडचे रुग्णालय

तपोवन येथे शंभर खाटांचे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. तपोवनातील मुख्य गेटजवळ महापालिकेची वास्तू असून, त्या ठिकाणी यापूर्वीही कुंभमेळ्यात रुग्णालय तयार करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा या इमारतीवर एक मजला बांधण्यात येणार आहे. 

याठिकाणी आयसीयू आणि ऑपरेशन थिएटरदेखील बांधण्यात येणार आहे. साधुग्रामच्या जागेतच हे रुग्णालय असल्याने कोणाची प्रकृती बिघडली अथवा हृदयविकाराचा झटका आला तरी तातडीने गोल्डन अवरमध्ये उपचार करता येतील.

वैद्यकीय विभाग कंत्राटी स्टाफ भरणार

महापालिकेने कुंभमेळ्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला असला तरी मनुष्यबळाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. वैद्यकीय विभागासाठी कंत्राटी पद्धतीने डॉक्टर आणि नर्सेस आणि तत्सम स्टाफ घेण्यात येणार आहे. 

मात्र, शासन स्टाफ घेऊन देणार की, महापालिकेने तो घ्यायचा आहे, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय देवकर यांनी सांगितले.

इंदिरा गांधी रुग्णालयाचे नूतनीकरण

पंचवटी कारंजावरील इंदिरा गांधी रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात येणार असून, येथे आणखी शंभर बेड वाढवण्याचा प्रस्ताव आहे. साधुग्राम आणि मिरवणूक मार्ग किंवा गोदाघाटाजवळ हेच सर्वांत मोठे रुग्णालय असणार आहे. 

त्याचप्रमाणे मालेगाव स्टँडजवळील महापालिकेच्या भांडाराच्या जागेत नूतन रुग्णालय बांधण्याचा प्रस्ताव आमदार अॅड. राहुल ढिकले यांनी दिला होता. मात्र, तो अमलात आलेला नाही. आता या रुग्णालयासाठी शासनाकडून निधी मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
 

Web Title : नासिक कुंभ मेला: आपातकाल के लिए गोदा घाट पर ऑनसाइट आईसीयू।

Web Summary : नासिक कुंभ मेले की तैयारी कर रहा है, जिसके तहत गोदा घाट के पास ऑनसाइट आईसीयू और 51 तम्बू अस्पताल होंगे। तपोवन में आईसीयू के साथ 100 बिस्तरों वाला अस्पताल बनाया जाएगा, और इंदिरा गांधी अस्पताल का नवीनीकरण किया जाएगा। संविदात्मक चिकित्सा कर्मचारियों को काम पर रखा जाएगा।

Web Title : Nashik Kumbh Mela: Onsite ICU at Goda Ghat for emergencies.

Web Summary : Nashik is preparing for Kumbh Mela with onsite ICUs and 51 tent hospitals near Goda ghat. A 100-bed hospital with ICU will be built at Tapovan, and Indira Gandhi Hospital will be renovated. Contractual medical staff will be hired.