शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

कांदा परवडत नसेल तर खाऊ नका! : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 01:58 IST

कांद्याचा प्रश्न राज्यात आणि देशात ज्वलंत झालेला आहे. माझा नेहमीचा प्रश्न आहे, कांदा परवडत नसेल तर तो खाऊ नका त्यामुळे काही फरक पडत नाही. किमान माझ्या शेतकऱ्याला दोन पैसे तरी मिळतील.

लासलगाव/निफाड : कांद्याचा प्रश्न राज्यात आणि देशात ज्वलंत झालेला आहे. माझा नेहमीचा प्रश्न आहे, कांदा परवडत नसेल तर तो खाऊ नका त्यामुळे काही फरक पडत नाही. किमान माझ्या शेतकऱ्याला दोन पैसे तरी मिळतील. कांदा ५०-६० रु पये किलो झाला की, लगेच ओरड सुरु होते. हे कोठेतरी थांबायला हवे. जर कांदा खायचाच असेल तर स्वत: शेत घ्या, नींदणी करा, तेव्हाच शेतकºयाचे दु:ख कळेल, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणीप्रसंगी निफाड तालुक्यातील कोळवाडी (श्रीरामनगर) येथे ते बोलत होते. खोत पुढे म्हणाले, ‘परतीच्या पावसाने यंदा कांद्याचे मोठे नुकसान होणार आहे. परिणामी कांद्याचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कांदा ५०-६० रु पये किलो दराने खावा लागला, तर खाल्ला पाहिजे. कांदा हा काही अणुबॉम्ब नाही. शेतकरी ३-४ महिन्यात लागेल तितका कांदा पिकवू शकतो. यंदा अतिपावसाने कांद्याचे उत्पादन घटणार आहे. कांदा लागवड क्षेत्रही कमी होणार आहे. अशा परिस्थितीत बाजारपेठेची कांद्याची मागणी लक्षात घेऊन पुरवठा करण्याचे धोरण शासनातर्फेराबवले जाईल, असे सांगून सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेईल, असे आश्वासन खोत यांनी दिले. कांद्याचे भाव अनेकदा अस्थिर होतात. त्यावेळी देशभरात फक्त कांद्याची चर्चा केली जाते. त्यासाठी कांदा आयात-निर्यातीचे किमान पाच वर्षांचे कायमस्वरूपी धोरण आखणे गरजेचे आहे. भविष्यात शेतकऱ्यांना फायदा करून द्यायचा असेल, तर कांदा निर्यातीचा निर्णय केंद्रसरकारला घ्यावा लागेल, असेही खोत म्हणाले.श्रीरामनगर येथे ढगफुटी व गारपीट होऊन द्राक्षबागा व मका पिकाचे नुकसान झाले. या क्षेत्राची पाहणी त्यांनी केली. शनिवारी मदत व पुनर्वसन समितीची मंत्रालयात बैठक होत आहे. या बैठकीत अहवाल मांडणार असल्याचे खोत म्हणाले. श्रीरामनगर येथील कोंडाजी शिंदे यांच्या द्राक्षबागेचे व मका पिकाचेही नुकसान झाले. या बागेला खोत यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी भीमराज काळे, संपत खताळे, रावसाहेब गोळे, रवींद्र शिंदे यांनी समस्यांचा पाढा वाचला.

टॅग्स :onionकांदाSadabhau Khotसदाभाउ खोत agricultureशेती