शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

देवीच्या मूर्तीवर फिरवण्यात येतोय अखेरचा हात

By admin | Updated: September 27, 2016 01:15 IST

वेध नवरात्रोत्सवाचे : बंगाली बांधवांकडून मूर्तीला विशेष मागणी

नाशिक : गणेशोत्सवाची उत्साहात सांगता झाल्यानंतर भाविकांना वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. अवघ्या पाच दिवसांवर नवरात्र उत्सव येऊन ठेपला असून, शहरात सर्वत्र जय्यत तयारी सुरू झाली आहे. शहरातील देवी मंदिरांना रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाईचे काम अंतिम टप्प्यात आले असून, मूर्तींवरदेखील अखेरचा हात फिरवण्यात येत आहे.दुर्गा माता, कालिका माता, अंबे माता, शेरावाली माता अशी विविध देवींची रूपे नाशिकचे मूर्तीकार गौतम पाल यांनी साकारल्या आहेत. गौतम पाल यांची ही दुसरी पिढी असून बंगाली देवी बनविण्यात त्यांचे विशेष कसब आहे. दरवर्षी नवरात्रासाठी साकारण्यात येणाऱ्या मूर्तींसाठी एप्रिल महिन्यापासूनच तयारी करण्यास सुरुवात होते. नाशिकचे कलाकार गौतम पाल यांनी बनविलेल्या देवी मूर्तींना नाशिकसह देवळाली, ओझर, भुसावळ, जळगाव येथून मागणी आहे. २५ फूट बाय १८ फूट मूर्ती साकारण्यासाठी खास कोलकाता येथील होवरा नदीतील माती मागवण्यात आली आहे, तसेच देवीला सजवण्यासाठी लागणारा साजशृंगारदेखील कोलकाता येथूनच मागविण्यात आला आहे.कुठल्याही प्रकारचे प्लास्टर आॅफ पॅरिस किंवा सीमेंट तसेच कुठल्याही साच्याशिवाय या मूर्ती बनविण्यात आल्या आहेत. बांबूची रचना आणि वाळलेला चारा यांची लाकडी स्टॅण्डवर उत्कृष्ट बांधणी करून यावर मातीच्या देवीची भव्य मूर्ती साकारण्यात येते. मुख्य देवीसह लक्ष्मी, सरस्वती, गणपती, कार्तिक तसेच महिषासुर राक्षस आणि देवीचे वाहन असलेला वाघ अशी भव्य २५ फूट आडव्या मंचावर अगदी रेखीवपणे या मूर्ती उभारण्यात आल्या आहेत. गेल्या सात महिन्यांहून अधिक कालावधीपासून आठ ते दहा कारागीर या देवी मूर्ती साकारण्यासाठी मेहनत घेत आहेत. गांधीनगर मैदान येथे बंगाली बांधवांकडून साजरा करण्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी गेल्या ६४ वर्षांपासून पाल कुटुंबीयांकडूनच मूर्ती बनविण्यात येत आहेत.मातीपासून घडविण्यात आलेल्या मूर्ती पाहून भाविकांचे अक्षरश: डोळे दीपतात. मूर्तीच्या तोंडावरील हावभाव, रेखीव डोळे यांसह अत्यंत सूक्ष्मपणे केलेले कोरीव काम यामुळे देवीचे रूप अधिकच खुलते आणि भाविकांकडून अशा मूर्तीला दरवर्षी मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे पाल यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)