चौपदरीकरणासंदर्भात गडकरींना भेटणार

By Admin | Updated: July 30, 2014 00:18 IST2014-07-29T23:48:28+5:302014-07-30T00:18:33+5:30

नाशिक-पुणे महामार्ग : निमाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत उद्योजकांचा निर्णय

I will meet Gadkari on the four-dimensional process | चौपदरीकरणासंदर्भात गडकरींना भेटणार

चौपदरीकरणासंदर्भात गडकरींना भेटणार

सातपूर : रस्त्याच्या दोन्ही बाजूने भूसंपादन केल्यास नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करण्याच्या कामास गती मिळेल, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने याबाबत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची पुढच्या आठवड्यात भेट घेण्याचा निर्णय निमात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी येणाऱ्या अडचणींचा विचार करण्यासाठी निमात बैठक घेण्यात आली. या बैठकीस नाशिक सिटीझन फोरमचे जितूभाई ठक्कर, क्रेडाईचे अनंत राजेगावकर, महाराष्ट्र चेंबरचे संतोष मंडलेचा, निमाचे माजी अध्यक्ष मनीष कोठारी, अध्यक्ष रवि वर्मा, सरचिटणीस मंगेश पाटणकर, व्हिनस वाणी, आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, उत्तम दोंदे, एमआयडीसीचे उपकार्यकारी अभियंता पी. के. पाटील, आशिष नहार आदि उपस्थित होते.
रस्त्याच्या चौपदरीकरणात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांना बाजारभावाप्रमाणे दर मिळावा, रस्त्याच्या दोन्ही बाजूने भूसंपादन करावे, काही ठिकाणी शासकीय जागेचा वापर करावा, जमिनी देण्यास विरोध नसल्याची भूमिका पुंजाभाऊ सांगळे, प्रकाश वैरागर, अ‍ॅड. शरद गायधनी, ए. टी. पडवळ, गिरीश पालवे, दिलीप गायधनी आदि शेतकऱ्यांनी मांडली. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा निर्णय या बैेठकीत घेण्यात आला. अपेक्षित चर्चा झाल्यास स्थगिती मागे घेतली जाईल, अशीही भूमिका नाशिक-पुणे महामार्ग कृती समितीने जाहीर केली आहे. (वार्ताहर)

Web Title: I will meet Gadkari on the four-dimensional process