मी आमदार नसून जनतेचा सालदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:14 IST2021-07-28T04:14:17+5:302021-07-28T04:14:17+5:30

साकोरा : ‘आपण आमदार नसून जनतेचा सालदार असल्याचे सांगत, कोणालाही कधीही काहीही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधून आपल्या ...

I am not an MLA but a public figure | मी आमदार नसून जनतेचा सालदार

मी आमदार नसून जनतेचा सालदार

साकोरा : ‘आपण आमदार नसून जनतेचा सालदार असल्याचे सांगत, कोणालाही कधीही काहीही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधून आपल्या समस्या मला सांगा’, असे आवाहन आमदार सुहास कांदे यांनी साकोरा येथे झालेल्या शिवसेना अभियानांतर्गत मेळाव्यात केले.

नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे शिवसंपर्क अभियानांतर्गत साकोरा गट व गण, वेहळगाव गण तसेच मांडवड गण व साकोरा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती सुभाष कुटे ,माजी सभापती भाऊसाहेब हिरे, साकोरा जिल्हा परिषद गटाचे सदस्य रमेश बोरसे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, तालुका प्रमुख किरण देवरे, पं. स. चे माजी सभापती विलास आहेर, नांदगावचे नगराध्यक्ष राजेश कवडे, तेज कवडे , माजी सभापती सुधीर देशमुख , विष्णू निकम ,अमोल नावंदर, राजाभाऊ जगताप, ताराबाई सोनवणे उपस्थित होते. प्रास्ताविक सुभाष कुटे यांनी केले. विष्णू निकम , रमेश बोरसे , आण्णासाहेब पगार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

(२७ साकोरा २)

270721\27nsk_6_27072021_13.jpg

२७ साकोरा २

Web Title: I am not an MLA but a public figure