शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

ट्रकच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार; दोन अपघातांत तिघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 7:55 PM

जेलरोड कोठारी कन्या शाळा येथे रस्ता ओलांडताना दुचाकी-ट्रकमध्ये अपघात होऊन लाखलगाव येथील पती-पत्नी ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना घडली.

ठळक मुद्देजेलरोड, आडगाव शिवारात घडल्या दुर्घटना

नाशिक : शहरातील जेलरोड व आडगाव शिवारात महामार्गालगत भरधाव ट्रक व कंटेनरच्या धडकेत दुचाकीने प्रवास करणाऱ्या एका दाम्पत्यासह दुसऱ्या प्रवासी महिलेचा बुधवारी (दि.२१) जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.जेलरोड कोठारी कन्या शाळा येथे रस्ता ओलांडताना दुचाकी-ट्रकमध्ये अपघात होऊन लाखलगाव येथील पती-पत्नी ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना घडली. नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील लाखलगाव येथील चंद्रभान अशोक जाधव (४१) व त्यांची पत्नी मनीषा चंद्रभान जाधव (३८) हे दोघे बुधवारी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास भारत प्रतिभूती मुद्रणालयाकडून कोठारी कन्या शाळेजवळून त्यांच्या दुचाकीने (एम.एच.१५ एफवाय ७२०३) मार्गस्थ होत जेलरोडकडे वळण घेत होते. यावेळी जेलरोडकडून बिटकोकडे येणारा ट्रक (एमएच०४ डीएस ३५१४) व जाधव यांच्या दुचाकीमध्ये अपघात झाला. यामध्ये चंद्रभान व त्यांची पत्नी मनीषा जाधव हे दोघेही ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त दोन्ही वाहने व ट्रकचालक शेख हसन भिकन (रा. सिन्नर) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत चंद्रभान जाधव यांच्या पश्चात आई, दोन लहान मुले, भाऊ, भावजई असा परिवार आहे. 

आडगावला कंटनेरच्या धडकेत महिला ठार

 मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात असलेल्या हॉटेल जत्रा चौफुलीवर पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटनेरने रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुका येथील महिला जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत कंटेनर चालकाविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात राहणारे खंडू बाळू आगविले व त्यांची पत्नी निर्मला खंडू आगविले हे दाम्पत्य औरंगाबाद येथून घोटी-इगतपुरीला जात असताना हॉटेल जत्रा चौफुलीजवळ त्यांची दुचाकी (एमएच २० सी जी ५३८६) उभी केली असता पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दहाचाकी अवजड कंटेनरच्या ( एम एच.१५ ईजी ४७९१) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीजवळ उभ्या असलेल्या निर्मला गंभीर जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या पतीने तत्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली अपघाताबाबत सिन्नर येथील कंटेनरचालक अशोक रावबा चकोर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी