शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल्सवरही जेसीबी चालविण्यात येऊन अतिक्रमित बांधकाम हटविण्यात आले

By admin | Updated: January 7, 2015 01:14 IST

हॉटेल्सवरही जेसीबी चालविण्यात येऊन अतिक्रमित बांधकाम हटविण्यात आले

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गंगापूररोडवर सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार मोहीम राबवत वाहनतळाच्या जागांमध्ये अतिक्रमण करणाऱ्या हॉटेल्स व्यावसायिकांना आपले लक्ष्य केले. यात उपमहापौरांच्या बंधूंच्या हॉटेलसह माजी नगरसेवक, माजी आमदार, आरटीओ अधिकारी यांच्या मालकीच्या जागांवरील हॉटेल्सवरही जेसीबी चालविण्यात येऊन अतिक्रमित बांधकाम हटविण्यात आले. पालिकेने केलेल्या या कारवाईत दिवसभरात २८ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सोमवारपासून गंगापूररोडवरील व्यावसायिकांची अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू केली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही पालिकेने गंगापूररोडवरच मोहीम राबवत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे हटविली. अतिक्रमण निर्मूलन पथकाने सकाळी पहिल्यांदा पंडित कॉलनीतील श्री ज्योती बुक सेलर्सने वाहनतळाच्या जागेत उभारलेल्या पत्र्याच्या शेडवर जेसीबी चालवित अतिक्रमण जमीनदोस्त केले. पालिकेने श्री ज्योती बुक सेलर्सला सोमवारीसच सदर अतिक्रमण काढून टाकण्याची सूचना केली होती; परंतु अतिक्रमण न काढले गेल्याने पालिकेने आपले काम फत्ते केले. त्यामुळे बुक सेलर्समधील मालाचेही काही प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर पथकाने आपला मोर्चा जेहान सर्कलकडे वळविला. जेहान सर्कल ते आनंदवल्लीपर्यंत रस्त्यालगत असलेल्या हॉटेल्सची वाहनतळाच्या जागेतील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. त्यात प्रामुख्याने हॉटेल रेड चिली, हॉटेल मंगलम्, हॉटेल दुर्वांकुर, बॉबी रेस्टॉरंट, हॉटेल तंदूर फॅमिली, हॉटेल दिवट्या बुधल्या वाडा, गो-गोमंतक, हॉटेल काका का ढाबा या हॉटेल्सचा समावेश होता. पथकाने या सर्व हॉटेल्सने पार्किंगच्या जागेत केलेले पक्के बांधकाम, संरक्षक भिंती, पत्र्याचे शेड्स यावर जेसीबी चालवित ही अतिक्रमणे जमीनदोस्त केली. यावेळी काही हॉटेल्सचालकांनी कारवाई थांबविण्यासाठी फोनाफोनी करून पाहिली; परंतु पथकाने त्यांना कुणालाही दाद दिली नाही. काही हॉटेल्सचालकांनी आपण स्वत:हून अतिक्रमण काढून घेतो अशा विनवण्या केल्या; परंतु पथकाने विनंत्या फेटाळत कारवाई पूर्ण केली. पथकाने हॉटेल्सबरोबरच गंगापूररोडवर रुंदीकरणात बाधित होणाऱ्या पोद्दार हाऊसची सीमेंटची पक्की कमानही जमीनदोस्त केली. तसेच आनंदवल्ली गावातील शॉपिंग सेंटरचे अतिक्रमित ओटे, पेट्रोलपंपाची भिंत, गॅरेज, दुर्गा गॅस अ‍ॅटोचे अतिक्रमित बांधकामही हटविले. सुमारे २८ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.