दुचाकीला धडक; एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 08:43 PM2021-01-11T20:43:07+5:302021-01-12T01:22:06+5:30

मालेगाव : नाशिक-मालेगाव रस्त्यावर मुंगसे शिवारात गावानजीक भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने पुढे चालणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण ठार तर दुचाकीस्वार जखमी झाला. याप्रकरणी ट्रक क्रमांक एमएच ०४ जीआर २२३२ वरील चालकाविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Hit the bike; One killed, two injured | दुचाकीला धडक; एक ठार, दोन जखमी

दुचाकीला धडक; एक ठार, दोन जखमी

Next

गोपाल पावरा (३०) रा. आंबा फाटा, पोस्ट तहाडकसबे, ता. शिरपूर, जि. धुळे याने फिर्याद दिली. गेल्या शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. आरोपीने आपल्या ताब्यातील ट्रक एमएच ०४ जीआर २२३२ भरधाव वेगात चालवून पुढे चालणारी दुचाकी क्रमांक एमएच १८ बीटी १३४२ ला मागून धडक दिली. यात दुचाकी चालक रवींद्र गोपाल पावरा जखमी झाले, तर त्यांच्या पाठीमागे बसलेला अजय प्यारेलाल पवार (२७) रा. मुबारकपुरा, ता. शहादा, जि. नंदूरबार याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तो ठार झाला. अपघाताची खबर न देता पळून गेला म्हणून ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास जमादार खैरनार करीत आहेत.

Web Title: Hit the bike; One killed, two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.