शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

उच्चदाब वाहिनी पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

By admin | Updated: March 2, 2016 23:25 IST

उभाडे शिवारात तणाव : मृतदेह न उचलण्याची ग्रामस्थांची भूमिका

घोटी : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील उभाडे शिवारात वीज वितरण कंपनीची उच्चदाब वाहिनी अंगावर पडल्याने विद्यार्थिनीचा भाजून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी घडली. याबाबात पिंपळगाव मोर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.वीज वितरण कंपनीचा ढिसाळ कारभार या घटनेस कारणीभूत असून, कारणीभूत ठरलेल्या वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याखेरीज सदर विद्यार्थिनीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका तिच्या नातलगांनी व ग्रामस्थांनी घेतल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घोटीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंपळगाव मोर येथे बुधवारी दुपारी ३ वाजता उभाडे शिवारात शेतामध्ये उच्चदाब वाहिनी लोंबकळलेल्या अवस्थेत होती. तिच्या दुरुस्तीची मागणी गावकऱ्यांनी अनेकवेळा करूनही वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बुधवारी येथील गायत्री भाऊराव काळे (१५) या सहावीत शिकणाऱ्या मुलीच्या अंगावर ती वाहिनी तुटून पडल्याने गायत्री शंभर टक्के भाजली. तिला नाशिक येथे जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घोटी येथील विद्युत उपकेंद्रालगत उच्चदाब वाहिनी काही दिवसांपासून लोंबकळलेल्या अवस्थेत असल्याचे ग्रामस्थानी वारंवार सांगून याबाबीकडे उपकेंद्राने लक्ष दिले नसल्याची तक्र ार केली जात आहे.या घटनेने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केले जात असून, वीज मंडळाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत पिंपळगाव मोर येथे या घटनेबाबत ग्रामस्थानी आक्रमक भूमिका घेतली होती. घोटी पोलिसात याबाबत अकस्मात नोंद करण्यात आली आहे.(वार्ताहर)