शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांमधील खर्चाचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 01:25 IST

मागासवगीर्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी  सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये नाशिकच्या समाजिक न्याय विभागाने ९१ ते ९९ टक्के खर्च करून गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा चांगली कामगिरी केली आहे. 

ठळक मुद्देपाच वर्षांत आलेख उंचावला; ९९.२ टक्के निधी झाला खर्च

नाशिक : मागासवगीर्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी  सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये नाशिकच्या समाजिक न्याय विभागाने ९१ ते ९९ टक्के खर्च करून गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा चांगली कामगिरी केली आहे. मागील वर्षभरापासून राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने शासकीय यंत्रणेवरदेखील त्याचा परिणाम झाला आहे. अशा काळातही नाशिक समाजकल्याण विभागाने प्राप्त झालेल्या  निधीचा संपूर्ण खर्च करण्याची सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. शासनाकडून चालू वर्षात (२०२०-२१) प्राप्त झालेल्या राज्यस्तरीय योजनांच्या ९१.७७ टक्के निधी, तर अनुसूचित जाती घटक कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजनेचा प्राप्त झालेला ९९.२२ टक्के निधी विभागाने खर्च केला आहे.सन २०२०-२१ मध्ये राज्य शासनाकडून नाशिक समाजकल्याण विभागास    १७८ कोटी १८ लाख इतका निधी प्राप्त झालेला होता. त्यापैकी विभागाने  १६३ कोटी ५२ लाख खर्च केल्याने ९१.७७ टक्के निधी खर्च झाला आहे, तर जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरिता सन २०२०-२१ मध्ये  ३७८ कोटी ५ लाख विभागास प्राप्त झाले होते. त्यापैकी विभागाने ३७५ कोटी ८ लाख ६४ हजार खर्च केल्याने ९९.२२ टक्के निधी खर्च झाला आहे.भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी शासकीय वसतिगृह योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यास अनुदान योजना, स्वयंसेवी संस्थांना अनुदान योजना, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत पीडित व्यक्तींना अनुदान, तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या योजनांच्या प्रचार प्रसिद्धी या योजनांवर प्रामुख्याने निधी विभागाने खर्च केला आहे. यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर निधीचा विनियोग झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकSocial welfare divisional officeसमाजकल्याण उपायुक्त कार्यालय