उंबरगव्हाण येथील आरोग्य केंद्राची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 11:58 PM2018-11-18T23:58:13+5:302018-11-19T00:46:51+5:30

कळवण तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भाग असलेल्या गुजरात हद्दीलगत असलेल्या उंबरगव्हाण परिसरातील आदिवासी बांधवांच्या आरोग्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उंबरगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राची दोन वर्षांपूर्वी इमारत बांधली. प्रशासकीय कामकाज सुरू करण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आकृतिबंधानुसार वैद्यकीय अधिकाºयांसह आवश्यक १५ पदे मंजूर करण्यात आली आहे. तरीदेखील उंबरगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बंद अवस्थेत विनावापर पडून असल्याने शोभेचे बाहुले बनले आहे.

 Hearing of health center in Umbargavana | उंबरगव्हाण येथील आरोग्य केंद्राची हेळसांड

उंबरगव्हाण येथील आरोग्य केंद्राची हेळसांड

Next
ठळक मुद्दे इमारतीसाठी कोट्यवधी रु पयांचा खर्च; वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १५ पदे मंजूर तरी केंद्र बंद

मनोज देवरे । कळवण : कळवण तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भाग असलेल्या गुजरात हद्दीलगत असलेल्या उंबरगव्हाण परिसरातील आदिवासी बांधवांच्या आरोग्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उंबरगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राची दोन वर्षांपूर्वी इमारत बांधली. प्रशासकीय कामकाज सुरू करण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आकृतिबंधानुसार वैद्यकीय अधिकाºयांसह आवश्यक १५ पदे मंजूर करण्यात आली आहे. तरीदेखील उंबरगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बंद अवस्थेत विनावापर पडून असल्याने शोभेचे बाहुले बनले आहे.
जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना निवेदन पाठवून लक्ष वेधले आहे. कळवण तालुक्यात सध्या नवी बेज, कनाशी, मोकभणगी, नांदुरी, तिºहळ, दळवट, जयदर, ओतूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, त्यांच्या स्वत:च्या इमारती आहेत. उंबरगव्हाण येथे कोट्यवधी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, प्रशासकीय कामकाज सुरू झालेले नसल्याने इमारत सध्या बंद अवस्थेत विनावापर पडून असल्याने अतिदुर्गम भागातील आरोग्य प्रश्नांची हेळसांड होत आहे. मार्च २०१८ मध्ये आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राज्यातील आरोग्य संस्थेच्या वैद्यकीय अधिकाºयांसह कर्मचारी पदे मंजूर केली असूनसुद्धा आरोग्य विभागाने उंबरगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू न केल्याने आदिवासी जनतेला अनेक समस्यांना समोर जावं लागतं आहे.
सन २०१४ मध्ये उंबरगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे भूमिपूजन करून २०१६ मध्ये इमारतीचे काम ८० टक्के पूर्ण झाल्यानंतर शासन निर्णयानुसार आवश्यक अधिकारी व कर्मचारी यांची पदे मंजूर करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शासन निर्णयान्वये प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर हे केंद्र कार्यान्वित करण्यासाठी वेगवेगळ्या संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांची आवश्यकता असल्याने कळवण पंचायत समिती व नाशिक जिल्हा परिषद स्तरावरून आवश्यक अधिकारी व कर्मचारी यांच्या आकृतिबंधानुसार पद मंजुरी मिळविण्यासंदर्भात २५ जानेवारी २०१६ रोजी शासनाकडे प्रस्ताव पाठवून मागणी करण्यात आली होती. शासनस्तरावरून प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक असणारी अधिकारी व कर्मचारी या पदांची आकृतिबंध निश्चित करण्यात येऊन ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेकरिता रुग्ण सेवा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आकृतिबंधानुसार पदनिर्मिती शासनस्तरावरून करण्यात आली असून, मार्च २०१८ मध्ये आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मान्यता दिली आहे.
आरोग्य केंद्र सुरू न झाल्याने जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी नाराजी व्यक्त करून याप्रश्नी आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे लक्ष वेधले आहे.
उंबरगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नियमित, काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल पद निर्माण करून प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज सुरू करण्यास मान्यता देण्यात येऊन वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक पुरुष व स्त्री, सहायक परिचारिका प्रसाविका, आरोग्य सहायक पुरु ष व स्त्री, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वाहनचालक, पुरुष व स्त्री परिचर, सफाईगार आदी १५ पदे मंजूर करण्यात आली आहेत.

Web Title:  Hearing of health center in Umbargavana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.