शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

कचरावेचक महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल : महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 17:07 IST

शहरात काही दिवसांपुर्वी ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसत होता. मात्र आता हे चित्र बदललेले आपल्याला दिसत आहे. यासाठी महापालिकेतर्फे सर्वोपरी उपाययोजना राबविण्यात येत असून शहरातील कचरावेचक महिलांचेही यासाठी योगदान असून त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी महापालिकेतर्फे सर्व मदत केली जाईल, असे महापौर सतिष कुलकर्णी यांनी सांगितले.

ठळक मुद्देआरोग्याच्या देखभालीसाठी महापालिकेतर्फे सर्व मदत केली जाईलप्लॅस्टिक कचºयाला महापालिका १० ते १५ रूपये दर देण्याचा प्रयत्न करणार महिलांसाठी विविध योजना राबवत आहे

नाशिक : शहरात काही दिवसांपुर्वी ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसत होता. मात्र आता हे चित्र बदललेले आपल्याला दिसत आहे. यासाठी महापालिकेतर्फे सर्वोपरी उपाययोजना राबविण्यात येत असून शहरातील कचरावेचक महिलांचेही यासाठी योगदान असून त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी महापालिकेतर्फे सर्व मदत केली जाईल, असे महापौर सतिष कुलकर्णी यांनी सांगितले.        सोशल एम्पॉवरमेंट फॉर व्हॉलंटरी अ‍ॅक्शन संस्थेच्या वतीने शुक्रवारी (दि.३१) गंजमाळ येथील रोटरी क्लबमध्ये कचरावेचक महिलांच्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. शहरी आरोग्य व कचरा व्यवस्थापन यावर महापालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. शहरात कचरा वेचणाऱ्या महिला दुर्गंधी, घाणीच्या ठिकाणी जाऊन आरोग्यास घातक कचरा गोळा करतात. त्या एक प्रकारे महापालिकेचे काम करत आहेत. पुण्यासह इतर महापालिका अशा महिलांसाठी विविध योजना राबवत आहे. त्या धर्तीवर नाशिक महापालिका या महिलांनी गोळा केलेल्या प्लॅस्टिक कचºयाला महापालिका १० ते १५ रूपये दर देण्याचा प्रयत्न करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या ज्योती नटराजन या होत्या. नटराजन यांनी कचरा वेचक महिलांचे महामंडळ स्थापन करून शासनाने त्यांच्यासह त्यांचे कुटुंबियांची सुरक्षा, मुलांचे शिक्षण, आरोग्य यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. या महिला कचरा वेचतात म्हणजे त्या घाण नाहीत. त्या या समाजाचा घटक असून समाज्याच्या आरोग्यास घातक ठरणारा कचरा त्या दुर करतात. समाजाने त्यांच्याकडे स्वच्छता दूत म्हणून पहावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी नगरसेविका वैशाली भोसले, संजय साबळे, आरोग्य अधिकारी सुनिल बुकाने, अ‍ॅड. विनय कटारे, राधा सहेगल, आसावरी देशपांडे, आयटकचे सचिव राजु देसले, चित्रा भवरे आदी उपस्थित होते. प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष राजपालसिंग शिंदे राणा यांनी तर केली तर सुत्रसंचालन यशवंत लाकडे यांनी केले. आभार बाबाजी केदारे यांनी मानले. 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWomenमहिला