पाच रुपयांसाठी मोजले ‘त्याने’ पाचशे रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:54 IST2017-09-11T00:54:34+5:302017-09-11T00:54:34+5:30

केवळ पाच रुपयांच्या नाण्यासाठी ‘त्याने’ आजवर अनेकदा पाचशे रुपयांपेक्षा अधिक पैसे मोजले आहेत. जुनी दुर्मीळ नाणी जमविण्याच्या छंदापायी फसगत आणि कित्येकदा भुर्दंड सोसावा लागूनही एका मूकबधिर ध्येयवेड्या तरुणाने नाणे जमविण्याचा छंद जोपासला आहे.

He counted for five rupees, 'he' got five hundred rupees | पाच रुपयांसाठी मोजले ‘त्याने’ पाचशे रुपये

पाच रुपयांसाठी मोजले ‘त्याने’ पाचशे रुपये

नाशिक : केवळ पाच रुपयांच्या नाण्यासाठी ‘त्याने’ आजवर अनेकदा पाचशे रुपयांपेक्षा अधिक पैसे मोजले आहेत. जुनी दुर्मीळ नाणी जमविण्याच्या छंदापायी फसगत आणि कित्येकदा भुर्दंड सोसावा लागूनही एका मूकबधिर ध्येयवेड्या तरुणाने नाणे जमविण्याचा छंद जोपासला आहे.
तुकाराम निना राऊत असे या मूकबधिर तरुणाचे नाव असून तो मोलमजुरी करतो. नाणे जमवून त्याचे प्रदर्शन करणे अथवा संग्राहक होणे असा कोणताही मोठा विचार त्याच्या डोक्यात डोकावला नाही. केवळ नाण्यांचे वेगळेपण पाहून त्याला अशी नाणी जमवावी, असे वाटले आणि त्याच्या छंदाला सुरुवात झाली. चलनात असलेली एक, दोन आणि पाच रुपयांची आजची नाणी आणि काही वर्षांपूर्वीच्या याच दराच्या नाण्यांवर असलेल्या वेगवेगळ्या मुद्रा याचे कुतूहल म्हणून तुकाराम राऊत याने नाण्यांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. त्याच्या या छंदाविषयी त्याचे बंधू विठ्ठल राऊत यांनी सांगितले की, तुकाराम हा कुणी दुर्मीळ वस्तूंचा संग्राहक अथवा अभ्यासक नाही. परंतु पूर्वी कोणत्याही दिन विशेषाचे कौतुक म्हणून नाण्यावर मोहर उमटविली जात असे. यातून त्या वर्षाचे महत्त्व अधोरेखित होत असे, ही बाब तुकारामाच्या लक्षात आली आणि त्याने या नाण्यांवर लक्ष केंद्रित केले. स्वत:कडे आलेल्या प्रत्येक नाण्याचे तो निरीक्षण करतो. मित्रांकडे असलेले नाणे स्वत:हून मागून घेतो आणि त्यातही तो नावीन्य शोधतो. कुणाकडे असे नाणे आहे असे कळल्यानंतर तो ते विकत घेतो. एका पाच रुपयाच्या नाण्यासाठी कधी त्याला पन्नास तर कधी पाचशे रुपयेदेखील मोजावे लागले आहेत. मोलमजुरी करणाºया आणि कर्णबधिर असलेल्या या कष्टकºयाच्या या छंदाने आता उभारी घेतली असून, नाण्यांचा संग्रह वाढविण्याचा त्याचा मानस आहे.

Web Title: He counted for five rupees, 'he' got five hundred rupees