शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

मनपात नोकरी देण्याचा प्रश्न विचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:51 IST

मुकणे धरणग्रस्तांच्या प्रश्नावर महापालिका व धरणग्रस्त यांच्यात मध्यस्थी करून स्थानिकांना नोकरी देण्याच्या प्रश्नावर नक्कीच मार्ग काढला जाईल, असे आश्वासन नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी मुकणे धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाला दिले.

घोटी : मुकणे धरणग्रस्तांच्या प्रश्नावर महापालिका व धरणग्रस्त यांच्यात मध्यस्थी करून स्थानिकांना नोकरी देण्याच्या प्रश्नावर नक्कीच मार्ग काढला जाईल, असे आश्वासन नाशिकचे जिल्हाधिकारी  राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी मुकणे धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाला दिले. मुकणे धरणातून नाशिक महानगरपालिकेला पाणी देण्याच्या बदल्यात धरणग्रस्तांना महापालिकेत नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाची इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासमवेत सोमवारी विशेष बैठक पार पडली. यावेळी महापालिकेत बैठक घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी केल्या.या विषयावर धरणग्रस्तांसाठी सकारात्मकतेने विचार करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी दिले. नाशिक महापालिकेला मुकणे धरणातून थेट पाणी देण्याचे काम प्रगतिपथावर आहे. परंतु धरणग्रस्तांच्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने इगतपुरीच्या आमदार गावित यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांच्या दालनात उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, महापालिकेचे कार्यकारी अभियंता एस. एम. चव्हाणके, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. शिंदे यांच्यासमवेत मुकणे धरणग्रस्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती.शिष्टमंडळात वाडीवºहेचे सरपंच रावसाहेब कातोरे, विलास मालुंजकर, दिलीप शेजवळ, जगन राव, काशीनाथ बोराडे, दशरथ जमधडे, काशीनाथ गोवर्धने, सचिन मते, बस्तीराम खातळे, गणेश खकाळे, बाळासाहेब गोरे, कैलास जाधव, गुलाब वाजे,भास्कर आवारी, शिवाजी गायकर,भास्कर खातळे, रंगनाथ खातळे, अंबादास कातोरे, करू गोवर्धने, संपत वाजे,विष्णुं शिंदे, विष्णू मालुंजकर यांसह असंख्य धरणग्रस्त उपस्थित होते.