तपोवनातून हनुमान मूर्तीची चोरी

By Admin | Updated: January 25, 2016 22:51 IST2016-01-25T22:51:55+5:302016-01-25T22:51:55+5:30

तपोवनातून हनुमान मूर्तीची चोरी

Hanuman idol stolen from Tapovana | तपोवनातून हनुमान मूर्तीची चोरी

तपोवनातून हनुमान मूर्तीची चोरी

नाशिक : तीर्थाटनासाठी नाशिक शहरात आलेले गुजरातमधील आखाड्याच्या महंतांकडील एक लाख रुपये किमतीची हनुमानाची दीड फूट उंचीची व पाच किलो वजनाची अष्टधातूची मूर्ती चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़२३) सकाळच्या सुमारास तपोवनात घडली आहे़ याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमधील जुनागडमधील महाराज भीमदास गुरू सुरेशदास (२९, रा़ जुनागड, गाव जलराणा, ता़ मेघडा, जि़जुनागड) हे आपल्या आखड्याच्या महंतांसमवेत नाशिकला तीर्थाटनासाठी आले आहेत़ औरंगाबाद रोडवरील तपोवनात वास्तव्यास असलेले महाराज व महंत हे शनिवारी (दि़२३) सकाळी ९ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास रामकुंडावर दर्शनासाठी आले होते़ पंचवटीतील मंदिरामधील दर्शन आटोपून ते पुन्हा तपोवनात गेले असता चबुतऱ्यावर ठेवलेली हनुमानाची मूर्ती चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी एक दिवस शोध घेऊन शनिवारी आडगाव पोलीस ठाणे गाठून चोरीची फिर्याद दिली़ (प्रतिनिधी)

Web Title: Hanuman idol stolen from Tapovana