शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेच्या कंत्राटात ‘हात’सफाई

By admin | Updated: August 22, 2015 00:10 IST

स्थायी समितीकडून पोलखोल : साधुग्राममध्ये धडक देत केली चौकशी; ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे आदेश

नाशिक : साधुग्राममधील स्वच्छतेच्या ठेक्याबाबतचा वाद न्यायप्रविष्ट असताना महापालिका प्रशासनाने स्थायीची मान्यता न घेता ठेकेदारांच्या माध्यमातून परस्पर १२६१ सफाई कामगारांना काम दिल्याने न्यायालयाचा अवमान झाल्याची तक्रार करत स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी अगोदर प्रशासनाला धारेवर धरले आणि बैठकीनंतर लागलीच साधुग्राममध्ये थेट धडक देत स्वच्छतेच्या कामात ठेकेदारांकडून हातसफाई होत असल्याची पोलखोल केली. ठेकेदारांकडून निविदेप्रमाणे कामगारांना सोयीसुविधा पुरविल्या नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनीही त्याबाबत गांभीर्याने घेत संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाईचे आदेश आरोग्य विभागाला दिले.साधुग्राममधील स्वच्छतेच्या ठेक्याचा वाद गेल्या दोन महिन्यांपासून गाजतो आहे. प्रकरण न्यायालयात गेले असताना आता स्थायी विरुद्ध प्रशासन यांच्यात अधिकारावरून जुंपली आहे. त्याचे पडसाद शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. या प्रकरणाचा प्रारंभापासून पाठपुरावा करणारे प्रा. कुणाल वाघ यांनी सभापतींना पत्र देऊन वॉटरग्रेस प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली तसेच प्रशासनाकडून सार्‍या प्रक्रियेत ठेकेदाराला पाठीशी घातले गेल्याचा आरोप केला. त्यानंतर शोभा फडोळ, राहुल दिवे यांचेसह सभापती शिवाजी चुंभळे यांनी एकेक मुद्यावर प्रशासनाला घेरण्यास सुरुवात केली. आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी आयुक्तांनी निविदेनुसार करारनाम्यातील अटी-शर्ती कलम १४ नुसार स्वत:च्या अधिकारात तीन पाळ्यांमध्ये ठेकेदारामार्फत १२६१ कामगारांना सफाईचे काम दिले असल्याचे स्पष्ट केले आणि या कामगारांना स्वच्छता व साफसफाईच्या लेखाशीर्षातून वेतन अदा केले जाणार असल्याचे सांगितले. अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनीही सदर वेतनाची रक्कम अदा करण्यासाठी पुन्हा स्थायीची मंजुरी घेण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. सुमारे दोन-अडीच तास स्वच्छतेच्या ठेक्यावर काथ्याकूट झाला. अखेर सभापती शिवाजी चुंभळे यांनी साधुग्राममध्ये नेमलेल्या कामगारांना स्थायी समितीसमोर हजर करण्याचे आरोग्याधिकार्‍यांना आदेशित केले.