शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या वर्दीतील ठगबाज बापलेकांना बेड्या; बनावट ओळखपत्र, शिक्के जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 17:44 IST

लग्नासाठी त्याने मुलीच्या माता-पित्यांकडे व मुलीकडे अडीच एकर शेतीची मागणी करत धमकावण्यास सुरुवात केल्याचाही प्रकार पुढे येत असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देनांदगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाने रचला सापळावनविभागाने दोघा संशयितांना नांदगाव पोलिसांच्या हवाली केले

नाशिक : वनखात्यात उपविभागीय अधिकारी पदावर असल्याचे सांगून थेट वर्दी घालून मिरविणाऱ्या एका बीडच्या ठगाला नांदगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या चमूने मनमाड चौफुलीवर सापळा रचून रंगेहाथ ताब्यात घेतले. लहू साहेबराव जायभावे (३५, रा.  बीड) असे या संशयित ठगबाजाचे नाव असून, त्याला अशाप्रकारे सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करण्यासाठी स्वत: त्याचे वडील साहेबराव जायभावेदेखील मदत करत असल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे.याबाबत पूर्व नाशिक वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, वनविभागात 'मी उपविभागीय अधिकारी असून, तुम्हाला भरती व्हायचे असेल तर मला दहा हजार मोजा' असे सांगून हा बहाद्दर थेट वर्दी घालत वनविभागाचे बनावट नियुक्ती आदेश व ओळखपत्र दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घालत होता. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वनक्षेत्रपाल दत्तात्रय बोरसे यांनी पथक तयार करून येथील एका चहाच्या टपरीलगत सापळा रचला. संशयित लहू हा तेथे वनविभागाच्या शासकीय वर्दीमध्ये दाखल झाला असता त्यास पथकाने ताब्यात घेतले.नांदगाव येथील ज्ञानेश्वर नीळकंठ इप्पर (रा.कासारी), सचिन भागवत सानप (रा.बेजगाव) सखाराम पुंजाबा भुसनर (रा. माहेगाव) यांच्याकडून लहूने वनखात्यात भरती सुरू असल्याचे सांगत प्रत्येकी पाच ते दहा हजारांची मागणी केली होती. या मागणीनुसार लहू हा चहाच्या टपरीवर पैसे घेऊन त्यांना वनखात्यात नोकरी लागल्याचा बनावट नियुक्ती आदेशपत्र देणार होता, असे बोरसे यांनी सांगितले. वनकर्मचाऱ्यांनी त्याची झडती घेतली वनविभागाचे बनावट शिक्के, कागदपत्रे आढळून आली. वनविभागाने दोघा संशयितांना नांदगाव पोलिसांच्या हवाली केले आहे....अडीच एकर शेतीची मुलीच्या पित्याकडे मागणीवनविभागात मोठ्या पदावर असल्याचे सांगत या संशयित तोतया लहू जायभावे याने स्वत:च्या लग्नासाठी एका कुटुंबीयांकडे त्यांच्या मुलीसाठी मागणं घातले. लग्न जमल्यावर मुलीसोबत फोटो काढून तिचे छायाचित्र स्वत;च्या सोशल मीडियावरही पोस्ट केले; मात्र लग्नासाठी त्याने मुलीच्या माता-पित्यांकडे व मुलीकडे अडीच एकर शेतीची मागणी करत धमकावण्यास सुरुवात केल्याचाही प्रकार पुढे येत असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागArrestअटकfraudधोकेबाजी