शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

नाशकात करवाढीने सत्ताधारी भाजपाच्या अडचणी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 4:11 PM

व्यापारी-उद्योजक नाखूश : विद्यार्थी सेनेने केली घरपट्टीची होळी

ठळक मुद्देनोटाबंदी, जीएसटीमुळे मंदीचे भोग भोगणाºया व्यापारी-उद्योजकांची महापालिकेने ‘करकोंडी’ करण्याचे ठरविल्याने सत्ताधारी भाजपाविरूद्ध हा वर्ग दुखावला जाण्याची चर्चा निवासी मिळकतींसाठी ८० टक्के, अनिवासी मिळकतींसाठी १२२ टक्के तर औद्योगिक वापराच्या मिळकतींसाठी १३८ टक्के कर लागू केला जाणार आहे

नाशिक - महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेसमोर मिळकत करांमध्ये वाढ करण्यासंदर्भात ठेवलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सत्ताधारी भाजपाच्या अडचणी वाढणार आहेत. निवासी मिळकतीवर ३३ टक्के दरवाढीचा बोजा पडणार आहे परंतु, या दरवाढीचा सर्वाधिक फटका व्यापारी व कारखानदार-उद्योजक यांना बसणार आहे. अगोदरच नोटाबंदी, जीएसटीमुळे मंदीचे भोग भोगणाºया व्यापारी-उद्योजकांची महापालिकेने ‘करकोंडी’ करण्याचे ठरविल्याने सत्ताधारी भाजपाविरूद्ध हा वर्ग दुखावला जाण्याची चर्चा आता खुद्द भाजपातूनच होऊ लागली आहे. दरम्यान, विद्यार्थी सेनेच्यावतीने आज महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानासमोर घरपट्टीची होळी करत करवाढीचा निषेध नोंदविला आणि भाजपाविरोधी घोषणा दिल्या.मंगळवारी (दि.२०) झालेल्या महासभेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिककरांवर जबर करवाढ लादणारा मिळकत कराचा प्रस्ताव ठेवला होता. सदर करवाढ ही भाडेमूल्याऐवजी रेडीरेकनरनुसार भांडवली मूल्यावर आधारित करण्याचा हट्ट मुंढे यांनी सत्ताधारी भाजपापुढे धरला होता. परंतु, त्यातील धोके लक्षात घेऊन महापौरांनी भाडेमूल्यावर आधारितच करवाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार, मनपा व शासन करांसह निवासी मिळकतींसाठी ८० टक्के, अनिवासी मिळकतींसाठी १२२ टक्के तर औद्योगिक वापराच्या मिळकतींसाठी १३८ टक्के कर लागू केला जाणार आहे. यामध्ये, करवाढीचा सर्वाधिक फटका हा व्यापारी आणि कारखानदार-उद्योजकांना बसणार आहे. व्यापारी आणि कारखानदार यांच्याकडून दुपटीपेक्षा जास्त कर वसुल केला जाणार आहे. शहरात नव्याने केलेल्या मिळकत सर्वेक्षणानुसार, ४ लाख ७६ हजार मिळकती आढळून आल्या असून आणखी त्यात ४० ते ४५ हजार मिळकतींची भर पडण्याची शक्यता आहे. निवासी मिळकतींसाठी महापालिकेकडून भाडेमूल्य ५० पैसे दरमहा प्रती चौरस फूट आकारले जाते. तर बिगर घरगुतीसाठी १.८० रुपये तर औद्योगिकसाठी ४५ पैसे दर आहे. १९९९ पासून या दरामध्ये वाढ झालेली नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे