मालेगावी मूकबधिरांच्या समूह नृत्य स्पर्धा

By Admin | Updated: September 16, 2014 00:24 IST2014-09-15T20:58:09+5:302014-09-16T00:24:05+5:30

मालेगावी मूकबधिरांच्या समूह नृत्य स्पर्धा

Group dance competition of Malegavi Mookbirds | मालेगावी मूकबधिरांच्या समूह नृत्य स्पर्धा

मालेगावी मूकबधिरांच्या समूह नृत्य स्पर्धा


मालेगाव कॅम्प : मालेगावी जैन संघटनेतर्फे अंध, अपंग, मूकबधिर विद्यार्थ्यांच्या अपंग समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. माळी मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीनिवास काकाणी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ओंकार लिंगायत उपस्थित होते.
जैन संघटना संचलित आनंद मंगल संस्था, जैन संगिनी फोरम यांच्या समन्वयाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत मालेगाव, सटाणा, येवला, नाशिक येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. येथील संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अप्रतिम कलेने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. शारीरिक दृष्ट्या आपण अपंग असलो
तरी जिद्दीने काही करून दाखवू शकतो हे सिद्ध करून दाखवले. स्पर्धेत वृक्षतोड, पर्यावरण, सर्कस, जागर, गोंधळ, भुताणे झपाटले आदिंवर आपल्या कला दाखवत समूहनृत्य केले. प्रास्ताविक रेखा नहार यांनी केले.
कार्यक्रमात आठ ते दहा समूह गटांनी सहभाग घेतला. यात सर्वप्रथम कार्यक्रमाचे पारितोषिक प्रबोधिनी स्कूल, नाशिक, दुसरे नाशिक प्रबोधिनी कार्यकारी विद्यालय, तिसरे महानव अंधशाळा यांना मिळाले. यात अंध, मूकबधिर विद्यार्थी केवळ आपल्या शिक्षकांच्या संकेत व संगीताच्या नादावर ताल धरत होते. त्यामुळे उपस्थित सर्व अचंबित झाले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र बोरा यांनी केले. संघटनेच्या अध्यक्ष कविता कासलीवाल, उपाध्यक्ष अनुपमा कासलीवाल, संगिनी फोरम्या सौ. पंकज वडेरा, ममता कासलीवालसह जैन संघटनेचे ट्रस्टी सचिन शहा, सदस्य वर्धमान नानावटी, नेमिचंद मोदी, अनिल लोढासह विविध संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Group dance competition of Malegavi Mookbirds