लाखलगाव शाळेत गाडगेबाबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:17 IST2021-02-25T04:17:11+5:302021-02-25T04:17:11+5:30

यावेळी मालपुरे यांच्यासह ज्येष्ठ शिक्षिका विजया पगार यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून ...

Greetings to Gadge Baba at Lakhalgaon School | लाखलगाव शाळेत गाडगेबाबांना अभिवादन

लाखलगाव शाळेत गाडगेबाबांना अभिवादन

यावेळी मालपुरे यांच्यासह ज्येष्ठ शिक्षिका विजया पगार यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुणे लाखलगाव भजनी मंडळातील ज्येष्ठ नागरिक निवृत्ती जाधव यांनी आपल्या मनोगतात गाडगेबाबा लाखलगावात दोनदा आल्याचा उल्लेख केला. यावेळी विजया पगार, नीता कदम, सुचित्रा देवरे, विजय जगताप, शीतल पगार यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जगताप यांनी केले तर आभार शीतल पगार यांनी मानले. (फोटो २४ लाखलगाव)

फोटो- लाखलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करताना मुख्याध्यापक राजेंद्र मालपुरे, विजय जगताप, निवृत्ती जाधव, विजया पगार, नीता कदम, शीतल पगार, सुचित्रा देवरे आदी.

Web Title: Greetings to Gadge Baba at Lakhalgaon School