शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

वेदाच्या समृद्धीसाठी सरकार प्रयत्नशील

By admin | Updated: March 28, 2015 00:49 IST

शास्त्री : वेद विद्या प्रतिष्ठानचा सन्मान सोहळा

  नाशिक : देशभरातील वेद केद्रांना ऊर्जितावस्था देण्यासाठी त्यांच्या समृद्धीसाठी भारत सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या महर्षि सान्दीपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठानचे सचिव डॉ. रूपकिशोर शास्त्री यांनी केले.शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृह येथे महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानच्या दशकपूर्ती महायाग व विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्यांच्या सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. शास्त्री म्हणाले की, देशभरातील सर्व जाती, धर्माच्या लोकांनी सेवाभावाच्या हेतूने प्रेरित व्हायला हवे. कारण विविध धर्मांच्या लोकांची जीवनशैली जरी वेगळी असली तरी, त्यांचे मन एकत्र आणण्याची किमया वेदांच्या साहाय्याने सहज साध्य करता येऊ शकते. ‘यत्र विश्वम् भवते एक निडम’ याप्रमाणे सर्व जातीधर्माच्या लोकांचा भाव एकच असतो. त्यातच वैदिक वाङ्मयात त्याच लोकांची पूजा होत असते, जे प्रगतीचा मार्ग निवडतात. दुसऱ्याच्या दु:खाला स्वत:चे दु:ख समजणाऱ्यालाच वेदात खरा संत म्हटले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महेश खैरनार (उद्योग), दीपक ठुबे (शेती), परवीन शेख (दिशा महिला संघटना), गणेश सूर्यवंशी (शिक्षण), अलीम पिरजादा (सामाजिक), अंबादास गांगुर्डे (जनसाथी सामाजिक संस्था), शरद शेजवळ (शाहीर), प्रकाश शेवाळे (पक्षिप्रेमी), लक्ष्मीकांत जोशी (आध्यात्मिक) आदिंचा विविध क्षेत्रांत योगदान दिल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, हिंदू मध्यवर्ती सैनिकी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश पाठक, स्वामी भक्तिचरणदास, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विश्वास देवकर, शांताराम भानोसे, संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पैठणे, प्रधानाचार्य रवींद्र पैठणे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)