शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील ५६९ कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर गुडबाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST

नाशिक- कोराेनामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या काळात कंत्राटी स्वरूपात भरती केलेले वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी अशा ५६९ जणांना अखेरीस ...

नाशिक- कोराेनामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या काळात कंत्राटी स्वरूपात भरती केलेले वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी अशा ५६९ जणांना अखेरीस महापालिकेने १ फेब्रुवारीपासून सेवामुक्त केले आहे. कोरोनाची स्थिती आटाेक्यात आल्यामुळे या कर्मचाऱ्यांना ३१ जानेवारीपर्यंत देण्यात आलेली मुदतवाढ संपताच त्यांचे काम थांबवण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात केारोनाचे संकट उद्‌भवल्यानंतर महापालिकेचीच नव्हे तर सर्वच शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने कोरोनाशी कसा मुकाबला करावा, असा प्रश्न निर्माण झाला असताना शासनाने कंत्राटी स्वरूपात तातडीने वैद्यकीय अधिकारी तसेच नर्स, वॉर्ड बॉय आणि अन्य कर्मचारी भरण्यास परवानगी दिली. शासनाच्या पोर्टलवरूनदेखील जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आले, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गतदेखील कर्मचारी उपलब्ध झाले. त्यामुळे नाशिक महापालिकेची तात्पुरत्या स्वरूपात कुमक उपलब्ध झाली. या कर्मचाऱ्यांना दर तीन महिन्यांनी मुदतवाढ देण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यानंतर कोरोना संसर्ग कमी होऊ लागला असला तरी हिवाळ्यात काेरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता गृहित धरून राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यामुळे नोव्हेंबर ते जानेवारी असे तीन महिने अखेरच्या टप्प्यातील मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदत अखेरीस ३१ जानेवारीस संपुष्टात आल्याने या आरोग्य कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला.

नाशिक महापालिकेत कायम डॉक्टर ४७ असून, आरोग्य अभियान आणि मानधनावरील डॉक्टरांची संख्या लक्षात घेतली तर सध्या आणखी ३० ते ३५ डॉक्टर्स उपलब्ध आहेत; मात्र त्यापलिकडे अन्य डॉक्टरांनादेखील निरोप देण्यात आला आहे. डॉक्टरांची गरज असली तरी त्याबाबत प्रशासन स्वतंत्र निर्णय घेऊन पुन्हा डॉक्टरांची भरती करेल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.

इन्फो..

जानेवारी महिन्याचे वेतन राहिले

ज्या कर्मचाऱ्यांना महापालिकेने निरोप दिला त्यांचे जानेवारी महिन्याचे वेतन मात्र अदा व्हायचे बाकी असून, येत्या काही दिवसात त्यांना ते दिले जाणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.