शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक क्षेत्राला येणार ‘अच्छे दिन’

By admin | Updated: September 20, 2014 00:39 IST

औद्योगिक क्षेत्राला येणार ‘अच्छे दिन’

 गोकुळ सोनवणे

सातपूरअंबड-सातपूर औद्योगिक परिसराच्या आजूबाजूला अतिरिक्त औद्योगिक वसाहतीसाठी जमीन उपलब्ध होत नसली, तरी जिल्ह्यातील तीन तालुक्यांत मात्र औद्योगिक विकास महामंडळाने एक हजार एकरच्या वर जमीन संपादित केली आहे. लवकरच या जमिनीवर मूलभूत सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नवउद्योजकांना आणि उद्योगांचा विस्तार करणाऱ्या उद्योजकांना या जमिनीचा फायदा होणार आहे.अतिरिक्त औद्योगिक वसाहतीसाठी सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीलगत जमीन उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निमा, आयमा या औद्योगिक संघटनांनी शासनाकडे केली आहे; परंतु अशी जमीनच उपलब्ध नसल्याने शासनाने तालुकापातळीवर औद्योगिक वसाहती उभारण्यास प्राधान्य दिले आहे. त्यादृष्टीने औद्योगिक विकास महामंडळाने भूसंपादनाची प्रक्रिया यापूर्वीच सुरू केली होती. शेतकऱ्यांच्या प्रचंड विरोधामुळे आणि राजकीय हस्तक्षेपामुळे भूसंपादनाची ही प्रक्रिया रखडली होती; परंतु शासनपातळीवर प्रयत्न सुरूच ठेवण्यात आल्याने आणि संबंधित शेतकऱ्यांना जमिनीचे भाव वाढवून मिळाल्याने अखेर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे.जिल्ह्यातील मालेगाव (सायने), येवला (चिचोंडी) आणि दिंडोरी (अक्राळे, तळेगाव) या तालुक्यांत नवीन औद्योगिक वसाहती उभारण्यास चालना मिळणार आहे. यात मालेगाव येथील २८३ एकर जमीन ताब्यात घेण्यात आली असून, संबंधित शेतकऱ्यांना पैशांचे वाटपही करण्यात आले आहे. येवला येथील २६० एकर जमीन ताब्यात घेण्यात आली. तेथील शेतकऱ्यांनाही संपूर्ण पैसे वाटप करण्यात आले आहेत. दिंडोरी तालुक्यातील अक्राळे आणि तळेगाव येथील ५०० एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यापैकी २५० एकर जमिनीचे पैसे वाटप सुरू आहे. दिंडोरी तालुक्यातील जमीन सुमारे ३५ लाख रुपये एकरने शेतकऱ्यांकडून विकत घेतली आहे. शासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे ६५ कोटी रुपये वाटपासाठी दिले आहेत. त्यापैकी २४ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे.शेतकऱ्यांना शासनाकडून अपेक्षित दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध करणे बंद केले आहे. दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथील ७६ आणि तळेगाव येथील ८२ शेतकऱ्यांनी जमिनी औद्योगिक वसाहतीला विकल्या आहेत. त्याचप्रमाणे ओढा ते गुळवंच रेल्वेमार्गासाठी १७२ हेक्टर भूसंपादन करण्यात आले आहे. या रेल्वेमार्गाने कोळसा वाहतूक होणार आहे. (प्रतिनिधी)