शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

सोन्या-चांदीच्या राख्यांची क्रे झ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:29 IST

बहीण-भावाचे नाते दृढ करणारी राखी ही प्रवाहाप्रमाणे बदलली असून, युवावर्ग आणि कॉर्पोरेट क्षेत्रात आता सोन्या-चांदीच्या राख्यांची क्रे झ वाढली आहे. अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर राख्यांची ही गरज पूर्ण करण्यासाठी नाशिकमधील सर्व सराफी पेढ्यांमध्ये सोन्या-चांदीच्या राख्यांचे शेकडो प्रकार उपलब्ध आहेत. खिशाला परवडेल अशा दरात म्हणजे अगदी सातशेपासून पाच हजार रु पयांपर्यंत सोन्याच्या डिझायनर राख्या सराफ व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.

नाशिक : बहीण-भावाचे नाते दृढ करणारी राखी ही प्रवाहाप्रमाणे बदलली असून, युवावर्ग आणि कॉर्पोरेट क्षेत्रात आता सोन्या-चांदीच्या राख्यांची क्रे झ वाढली आहे. अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर राख्यांची ही गरज पूर्ण करण्यासाठी नाशिकमधील सर्व सराफी पेढ्यांमध्ये सोन्या-चांदीच्या राख्यांचे शेकडो प्रकार उपलब्ध आहेत. खिशाला परवडेल अशा दरात म्हणजे अगदी सातशेपासून पाच हजार रु पयांपर्यंत सोन्याच्या डिझायनर राख्या सराफ व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.सध्या सोन्याच्या राख्यांना जास्त मागणी आहे. यात स्टोन राखी, एम्बास, अँटीक वर्क, कुंदन वर्क, पोलकी वर्क अशा विविध प्रकारच्या राख्यांना पसंती दिली जात आहे. तरु णवर्गाच्या मागणीप्रमाणे कमी वजनाच्या आणि दिसायला आकर्षक व सुबक राख्यांना प्रचंड मागणी असल्याचे सुवर्ण व्यावसायिक सांगतात. सोन्याची राखी दिसायला तर आकर्षक असतेच, शिवाय ती वर्षानुवर्षे तशीच जपून ठेवली जात असल्यामुळे अशा राख्या घेण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. सोन्याचे भाव चढेच असल्यामुळे राखीसाठी मोजलेले पैसे म्हणजे एकप्रकारची गुंतवणूकच असते. यातून सणही साजरा होतो व सोने खरेदीचा आनंदही मिळतो. सोन्याच्या राख्यांमध्ये चारशे ते साडेचारशे प्रकार आहेत. चांदीच्या राख्यांनाही चांगली मागणी आहे. मध्यमवर्ग आणि सर्वसामान्य लोकांकडून पूर्वीपासूनच चांदीच्या राखीला पसंती दिली जाते. यंदाही चांदीच्या राख्यांचे शेकडो प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. यात ब्रेसलेट, जडाऊ कलाकुसरीच्या राख्या, राखी कम ब्रेसलेट, मोत्याच्या राख्या असे विविध प्रकार आहेत. या राख्या दोनशेपासून वीस हजार रुपयांपर्यंत मिळत आहेत.