शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रायसोनी पतसंस्थेतून ठेवी द्या

By admin | Updated: August 22, 2014 00:28 IST

मागणी : प्रांताकडे निवेदन सादर

मालेगाव : येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-आॅप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड, जळगावच्या मालेगाव शाखेतील ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळावी, अशी मागणी शहर-तालुक्यातील ठेवीदारांनी प्रांत संदीप पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. रायसोनी सोसायटीचा विकास व विस्तार पाहून तेथे शहर - तालुक्यातील ठेवीदारांनी आपल्या ठेवी ठेवल्या; परंतू गेल्या वर्षभरापासून या सोसायटीत काही घोटाळे झाले. त्यामुळे सर्व ठेवीदार आपल्या ठेवी परत मागत आहेत. काही ठेवीदारांच्या मुलामुलींचे लग्न ठरले आहे. मात्र, ठेवी परत मिळत नसल्यामुळे ते होऊ शकलेले नाहीत. काहींना आजारपणासाठी पैशांची आवश्यकता आहे. मात्र त्यांनाही उपचारासाठी स्वत:चा पैसा मिळू शकलेला नाही. सदर सोसायटीतर्फे वेळोवेळी पैसे देण्याचे आश्वासन देऊनही पैसे देण्यात आलेले नाहीत. परिणामी ठेवीदार हवालदिल झालेले आहेत. त्यामुळे या प्रकरणात प्रांत कार्यालयाकडून कार्यवाही होऊन ठेवीदारांना त्यांची ठेवी परत मिळवून देण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी वालचंद छाजेड, धनराज चोरडिया, भरत शाह, आनंद भावसार, राजेंद्र बधान, सतीश भावसार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)