बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्याचा प्रयत्न; इन्स्टाग्रामवर फोटो व्हायरल केल्याने मुलीने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 15:06 IST2025-08-25T15:05:51+5:302025-08-25T15:06:01+5:30

आरोपीने अॅसिड टाकण्याची दिली होती धमकी

Girl hangs herself in Nashik after photo goes viral on Instagram | बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्याचा प्रयत्न; इन्स्टाग्रामवर फोटो व्हायरल केल्याने मुलीने घेतला गळफास

बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्याचा प्रयत्न; इन्स्टाग्रामवर फोटो व्हायरल केल्याने मुलीने घेतला गळफास

Nashik Crime: 

नाशिकच्या अंबड तालुक्यात एकतर्फी प्रेमातून बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्याचा आग्रह धरत अॅसिड टाकून चेहरा विद्रूप करण्याची धमकी दिल्याप्रकरणी अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. अल्पवयीन मुलीसोबत गळ्यात हात घालून काढलेला फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल केल्याने बदनामी झाल्याने मुलीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. अंबड पोलिसांनी संशयित आरोपी गणेश मानिक भांगरे (२०) व अक्षय मदन वरठे यांना बेड्या ठोकल्या. न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

एका महाविद्यालयात पदवीच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या १७वर्षीय मुलीवर संशयित गणेश हा एकतर्फी प्रेम करत असल्याचा दावा करत महाविद्यालय सुटल्यानंतर अडवून छेड काढत प्रेमसंबंध ठेवण्यासाठी बळजबरी करत होता. ही बाब तिने आई-वडिलांनाही सांगितली होती. त्याच्यासोबत त्याचा मित्र अक्षय हादेखील असायचा. दरम्यान, मंगळवारी (दि.१२) नात्यातील संशयित अतिश वैद्य याने पीडितेसोबत गळ्यात हात घालून काढलेला फोटो गणेशचा मित्र अक्षय यास इन्स्टाग्रामवर पाठविला. त्याने तो फोटो गणेशलाही दाखविला. यानंतर गणेशने पीडित मुलीला फोन करून शिवीगाळ करत मानसिक त्रास दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

मुलीच्या वडिलांनी गणेशला भेटून जाब विचारला. तेव्हा त्याने 'मी यानंतर तुमच्या मुलीला छेडणार नाही,' असे सांगितले होते.

 १२ ऑगस्ट रोजी रात्री ती खोलीत गेली आणि गळफास घेत आत्महत्या केली, असे फिर्यादीत पीडित मुलीच्या आईने म्हटले आहे. या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Girl hangs herself in Nashik after photo goes viral on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.