कारगिल विजय दिनानिमित्त सैनिकांचा गौरव सोहळा

By Admin | Updated: July 28, 2014 23:28 IST2014-07-28T22:38:21+5:302014-07-28T23:28:37+5:30

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिकांचा गौरव सोहळा

Gaurav Ceremony of soldiers on the occasion of Kargil Vijay Day | कारगिल विजय दिनानिमित्त सैनिकांचा गौरव सोहळा

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिकांचा गौरव सोहळा

 

नाशिक : महाराष्ट्र बटालियन या एन.सी.सी. कॅडेट्सला प्रशिक्षण देणाऱ्या बटालियनमधील ३५ सैनिकी अधिकारी व जवानांचा सत्कार करत क्रीडा साधना संस्थेच्या वतीने कारगिल विजयदिन साजरा करण्यात आला़
त्र्यंबक विद्यामंदिर परिसरात एन.सी.सी. कॅडेट्सला प्रशिक्षण देण्यासाठी हे जवान येथे आले आहेत़ जिल्हा जम्परोपच्या राष्ट्रीय महिला खेळाडूंनी सर्व जवानांचे औक्षण करून त्यांना राख्या बांधल्या़ तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला़ याप्रसंगी सात महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग आॅफि सर कर्नल के. सी़ उपाध्याय, कर्नल प्रवीण विक्रम यांनी कारगिल युद्धाच्या आठवणी सांगत सैनिकांप्रती व्यक्त केलेल्या भावनांबद्दल सर्वांचे आभार मानले़
सेना मेडल मिळवलेले एस़ एम़ परबत, सुभेदार अमरसिंग देशमुख, महादेव गायकवाड, संतोष पावणे, राजेंदर सिंग, करण पाटील, रोहिदास मापारी, अरविंद जगताप, सुनील सोंडेकर, सुधीर पवार, संदीप गुंजाळ, वसंत सातपुते, शिवाजी पाटील, सबीर हुसेन, राजू चौधरी, माधव गोणसे, संजय पाटील, मंगेश लावगुडे, बाजीराव बोगर, जांबू जाव्हाने, सुरेश तांबे यांचा सत्कार करण्यात आला़ क्रीडा साधनाचे अध्यक्ष अशोक दुधारे, आनंद खरे, संजय पाटील, अविनाश खैरनार, संजय चव्हाण, सी़ डी़ रोटे, अंकुर अहेर, राहुल वाघमारे, राज माने, हर्षल चौधरी, मनोज म्हस्के, अजिंक्य दुधारे, अनाज कानोजिया, रितेश राऊत आदि उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Gaurav Ceremony of soldiers on the occasion of Kargil Vijay Day