शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडर नोंदणीचा गोंधळ कायम

By admin | Updated: January 8, 2015 00:46 IST

पुरवठा खात्याचे तेल कंपनीला पत्र : जबाबदारीची जाणीव

नाशिक : गॅस सिलिंडरचे अनुदान ग्राहकाच्या बॅँक खात्यात जमा करण्याच्या तेल कंपन्यांनी १ जानेवारीपासून घेतलेल्या निर्णयामुळे गॅस नोंदणीबाबत निर्माण झालेला गोंधळ दहा दिवसांनंतरही कायम असून, त्यासंदर्भात ग्राहकांची होणारी ओरड लक्षात घेता, जिल्हा पुरवठा खात्याने तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींना पत्र पाठवून जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. जिल्ह्यात अकरा लाखांहून अधिक गॅसधारक असून, त्यापैकी साडेचार लाख ग्राहकांनी बॅँकेत खाते उघडून त्याबाबतची माहिती गॅस कंपनीकडे सादर केली आहे. अशा ग्राहकांचे गॅस सिलिंडर अनुदान १ जानेवारीपासून बॅँकेत जमा करण्यास सुरुवात झाली आहे, तर सुमारे साडेसहा लाख ग्राहकांनी लवकरात लवकर बॅँकेत खाते उघडून त्याची माहिती गॅस कंपनीला द्यावी यासाठी तेल कंपन्यांनी प्रयत्न चालविले आहेत; परंतु हे सारे करत असताना गॅस ग्राहकांची माहिती साठवून ठेवणाऱ्या सॉफ्टवेअरचे काम तेल कंपन्यांनी ३० डिसेंबरपासून हाती घेतल्याने व ते अद्यापही चालूच असल्याने भ्रमणध्वनीवरून लघुसंदेशाद्वारे हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीकडे गॅस सिलिंडरची नोंदणीच होत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. यासंदर्भात हिंदुस्थान पेट्रोलियम (एचपी) गॅस वितरकांकडे चौकशी केली असता, त्यांनी चक्क तेल कंपनीकडे बोट दाखवून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न चालविला आहे. परिणामी नोंदणीच होत नसल्याने गॅस ग्राहकाला सिलिंडर मिळणे मुश्कील झाले आहे. तेल कंपनीच्या विक्री प्रतिनिधींकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. दहा दिवस उलटूनही या सर्व परिस्थितीतून कोणताही तोडगा निघत नसल्याने अखेर जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी बुधवारी तेल कंपन्यांना पत्र पाठवून गॅस सिलिंडर नोंदणीच्या गोंधळामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदार धरण्याची तंबी दिली आहे. ग्राहकांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची जबाबदारी तेल कंपन्यांची असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेऊ नये असे बजावून, गॅस वितरकाकडे ग्राहकांकडून बॅँक खाते व आधारबाबत माहिती घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशा विविध सूचना करणारे लेखी पत्र पाठविले आहे. (प्रतिनिधी)