शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशभक्तांना लागले उत्सवाचे वेध...

By admin | Updated: August 20, 2014 00:43 IST

कारागीर व्यस्त : गणेशोत्सव तयारीला वेग; कुटुंब रंगलेय सजावटीच्या नियोजनात

पंचवटी : विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाला अवघ्या अकरा दिवसांचा कालावधी शिल्लक असून, लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी तमाम गणेशभक्त सज्ज झाले आहेत. लाडक्या गणरायाचे घरात आगमन होण्यापूर्वी त्याच्या बैठकीच्या जागेची कशाप्रकारे सजावट करता येईल यासाठी कारागीर व्यस्त झाले असून, थर्माकॉलची मंदिरे बनविण्याच्या कामाला कारागिरांनी गती दिली आहे. सध्या बाजारात थर्माकॉलपासून बनविलेली मंदिरे विक्रीसाठी दाखल झाली असून, काही कारागीर तयार केलेल्या मंदिरांवर शेवटचा हात फिरवून सजावट करत आहेत. लाडक्या गणरायाला घरात आणल्यानंतर त्याच्या स्थापनेची जागा निश्चित करून घरातही सजावटीसाठी थर्माकॉलपासून तयार केलेली चित्ररथांची मंदिरे, मोराच्या आकाराची तसेच महालाच्या प्रतिमेच्या मंदिरांचा उपयोग करून घेत आहेत. थर्माकॉलपासून मंदिरे बनविणारे कारागीर व त्यांचे संपूर्ण कुटुंबीय सध्या या कामात गुंतलेले असून, रात्रीचा दिवस करत आहेत. गणेश चतुर्थीला अकरा दिवसांचा कालावधी असला तरी सजावटीचे साहित्य तयार करणाऱ्या कारागिरांसाठी ही वेळ स्पर्धेची आहे. कमी कालावधीत जास्तीत जास्त चांगली मंदिरे तयार करून ती ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. थर्माकॉलपासून तयार केलेल्या आकर्षक मंदिरांना अकराशे ते पाच हजार रुपयांपर्यंतची किंमत मिळते, असे कारागिरांकडून सांगितले जात आहे. कारागिरांनी स्वत:च्या कलेनुसार तर ग्राहकांना हवी असलेल्या आकारानुसार थर्माकॉलची मंदिरे तयार करण्याचे काम सुरू असून, गणेश प्रतिष्ठापनेच्या पाच ते सहा दिवस अगोदर काम पूर्ण करून ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे कारागिरांनी सांगितले. (वार्ताहर)