शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानाचे भवितव्य अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:39 IST

पिण्याचे पुरेसे शुद्ध पाणी व सार्वजनिक स्वच्छतेचा पुरस्कार करणाऱ्या मोदी सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

नाशिक : पिण्याचे पुरेसे शुद्ध पाणी व सार्वजनिक स्वच्छतेचा पुरस्कार करणाऱ्या मोदी सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.देशपातळीवर गावोगावी घरोघरी शौचालयाची निर्मिती केल्यानंतर या अभियानाचे काम डिसेंबरमध्ये संपुष्टात आले आहे. सोळा वर्षांपूर्वी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या अभियानाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, आगामी काळातील उपक्रमाबाबत सरकारकडून कोणतेही मार्गदर्शन आले नसल्याने स्वच्छ भारत अभियानाच्या भवितव्याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.सोळा वर्षांपूर्वी २००३ मध्ये तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने देशपातळीवर संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू केले होते. त्यात प्रामुख्याने द्रव व घनकचºयाची विल्हेवाट लावणे, अन्नपदार्थ खाण्याच्या आरोग्यपूर्ण सवयी, पर्यावरणीय आरोग्याचा विचार करण्यात आला होता. या अभियानाला मिळालेल्या प्रतिसादानंतर २०१२ मध्ये या अभियानाला ‘निर्मल भारत अभियान’ असे नामकरण करण्यात आले. त्यात पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा, आरोग्याच्या सोयींवर अधिक भर देण्यात आला. त्यानंतर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने २०१४ मध्ये या अभियानाचे ‘स्वच्छ भारत अभियान’ असे नामकरण करून प्रत्येकाच्या हातात झाडू देत गावपातळीवर स्वच्छता मोहीम राबवून अस्वच्छतेला वेशीबाहेर टाकण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यात प्रामुख्याने डिसेंबर २०१९ पर्यंत उघड्यावर केल्या जाणाºया मलविसर्जनाचे उच्चाटन करणे म्हणजे त्यासाठी घरोघरी शौचालय उभारणे, आॅक्टोबर २०१९ पर्यंत ग्रामीण भागात स्वच्छतेच्या व्याप्ती वाढविणे, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन करण्याचा उपक्रम हाती घेण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार गेल्या सहा वर्षांत देशपातळीवर घरोघरी शौचालय निर्मितीचा उपक्रम राबविण्यात आला. डिसेंबरअखेर या महत्त्वाच्या उपक्रमाचा समारोप करण्यात आला. परंतु नवीन वर्षात स्वच्छ भारत अभियानाविषयी केंद्र वा राज्य सरकारकडून ग्रामविकास यंत्रणेला कोणत्याही सूचना नाहीत. स्वच्छ भारत अभियानाचा उपक्रम व त्याचे उद्दिष्ट्ये साध्य करण्याची मुदत डिसेंबर २०१९ मध्येच संपुष्टात आली आहे. त्यापुढील उपक्रम म्हणजे सांडपाणी व्यवस्थापन व घनकचºयाचे व्यवस्थापन राबविण्याचे ठरविले तरी त्याबाबत शासनाकडून कोणतेही मार्गदर्शक तत्त्वे शासनाने जाहीर केलेले नाहीत. परिणामी प्रत्येक जिल्ह्णात, तालुक्यात व गावपातळीवर स्वच्छ भारत अभियानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांवर हातावर हात धरून बसण्याची वेळ आली आहे.स्वच्छता अभियान नावापुरतेविशेष म्हणजे स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात मोदी सरकारने देशपातळीवर मोठा गाजावाजा करून केली होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:च रस्त्यावर झाडू घेऊन उतरल्यामुळे सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी गावोगावी शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्थांनी लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविली होती. परंतु नव्याचे नऊ दिवसांप्रमाणे आता सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्वही कमी झाले असून, महात्मा गांधी जयंती-पुण्यतिथीपुरतेच ग्राम स्वच्छतेचे महत्त्व सीमित झाले आहे.

टॅग्स :Governmentसरकार