शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

नामकोच्या बारा माजी संचालकांचे भवितव्य छाननीत ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:57 IST

नाशिक मर्चंट बॅँकेत संचालक असताना विविध सहकारी बॅँका आणि वित्तीय संस्थांवर संचालक पद भूषविल्याचा ठपका असणाऱ्या बारा संचालकांना छाननीतच गारद करण्याचे प्रयत्न असून, संबंधित माजी संचालकांनादेखील त्याची कल्पना असल्याने गुरुवारी (दि.२९) होणाºया छाननीकडे बॅँकेच्या पावणे दोन लाख सभासदांचे लक्ष लागून आहे. या छाननीत मोठी कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे.

नामको बॅँक निवडणूकनाशिक : नाशिक मर्चंट बॅँकेत संचालक असताना विविध सहकारी बॅँका आणि वित्तीय संस्थांवर संचालक पद भूषविल्याचा ठपका असणाऱ्या बारा संचालकांना छाननीतच गारद करण्याचे प्रयत्न असून, संबंधित माजी संचालकांनादेखील त्याची कल्पना असल्याने गुरुवारी (दि.२९) होणाºया छाननीकडे बॅँकेच्या पावणे दोन लाख सभासदांचे लक्ष लागून आहे. या छाननीत मोठी कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे.नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असून, मोठ्या संख्येने अर्ज दाखल करण्यात आले आहेत. निवडणूक पूर्व प्रमुख पॅनलमध्ये समेट करून बिनविरोध निवडणूक पार पाडण्याचे प्रयत्न फोल ठरले असले तरी खरी कसोटी छाननीच्या वेळीच लागणार आहे. नाशिक मर्चंट बॅँकेत संचालक पद भूषवित असताना अन्य सहकारी संस्थेत काम केल्याने आक्षेप घेण्यात आला होता. रिझर्व्ह बॅँकेने प्रतिकूल मत नोंदविल्याने संबंधितांवर टांगती तलवार असून, हे संबंधित माजी संचालकांनादेखील माहिती आहे. नामको निवडणुकीत याबाबत आक्षेप घेतला जाणार असल्याचे यापूर्वीच सर्वच संबंधितांची कायदेशीर तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. एका प्रतिस्पर्धी पॅनलचे उनेते तर मुंबईत विधीज्ञांशी चर्चा करण्यासाठी गेल्याचे देखील सांगण्यात येत आहे. गुरुवारी (दि.२९) सकाळी ११ वाजता नामको बॅँकेच्या प्रशासकीय इमारतीत निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद भालेराव यांच्यासमोर छाननी होणार असून, त्यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार तयारीत असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी बॅँकेच्या निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संंबंधित माजी संचालकांची नावे वगळावीत यासाठी आक्षेप घेण्यात आला होता. ही हरकत फेटाळण्यात आली असली तरी भविष्यात हा मुद्दा उभा राहणार हे लक्षात घेऊनच दोन्ही गटांनी काम करण्याची तयारी सुरू केली आहे. दोन्ही गटांकडून कागदपत्रे आणि सोयीचे उच्च तसेच सर्वाेच्च न्यायालयाचे दाखलेदेखील संकलित करण्यात आले आहेत. त्यामुळे छाननीतील लढाईदेखील रंजक ठरण्याची शक्यता आहे.‘त्या’ उमेदवारांना माघार घेण्याची खेळीछाननीनंतर माघारीची कार्यवाही सुरू होणार आहे. त्यामुळे छाननीनंतर आपल्या पॅनलला अडचणीत आणणाºया उमेदवारांना माघार घेण्याचीदेखील खेळी करण्यात येणार आहे.नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीतील पॅनलची अद्याप घोषणा झाली नसली तरी ज्यांचा पॅनलमध्ये अधिकृतरीत्या सहभाग निश्चित नाही, अशांनीदेखील निवडणूक प्रचार सुरू केला असून, त्यांनी प्रमुख पॅनलच्या नावानिशी मतदान मागितले आहे.

टॅग्स :bankबँकNashikनाशिक