शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
5
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
6
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
7
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
8
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
9
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
10
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
11
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
12
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
13
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
14
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
15
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
16
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
17
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
18
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
19
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
20
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत विद्यार्थी स्वेटरविनाच

By admin | Updated: January 8, 2017 01:05 IST

आरोप : आदिवासी विकास विभागाचा गोंधळ सुरूच

नाशिक : आदिवासी विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सलग दुसऱ्या हिवाळ्यातही स्वेटर मिळालेले नाहीत. यामुळे ऐन थंडीच्या कडाक्यात विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागात विद्यार्थी थंडीत कुडकुडत असून, विद्यार्थ्यांना स्वेटर मिळावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार यांनी आयुक्तांकडे केली आहे.
रेनकोट निविदाचा घोळ झाल्याने विद्यार्थ्यांना ऐन पावसाळ्यात रेनकोटपासून वंचित रहावे लागले होते. इतकेच नव्हे तर सलग दुसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना स्वेटर न मिळाल्याने थंडीतच कुडकुडत बसावे लागत आहे. आताही आदिवासी विकास विभागामार्फत थंडीत पुरविल्या जाणाऱ्या स्वेटरचा असाच सावळा गोंधळ झाला. त्यामुळे आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना हिवाळ्यात स्वेटर मिळालेले नाही. जिल्ह्णात थंडीचा कडाका वाढत आहे, गेल्या आठवडाभरात तर थंडीचा पारा खाली उतरलेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात थंडीचा कडाका वाढलेली आहे.
या परिस्थितीत आश्रम-शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वेटर नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. स्वेटर नसल्याकारणाने विद्यार्थ्यांचे आजाराचे प्रमाणदेखील वाढले आहेत. यातच आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही. थंड पाण्याने त्यांना आंघोळ करावी लागते. खुद्द आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांच्या जिल्ह्यात जव्हार आश्रमशाळेतदेखील विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागत असल्याचे माध्यमांमधून दाखविण्यात आले.
मंत्र्यांच्या जिल्ह्यात असे असेल, तर राज्यातील आश्रमशाळांमध्ये काय परिस्थिती असेल. यासाठी थंडीचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांना तत्काळ स्वेटर मिळाली पाहिजेत, अशी मागणी डॉ. पवार यांनी केली. (प्रतिनिधी)