नाशिक : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी येथील एका व्यावसायिकाची तब्बल ८४ लाख २५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली.
या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विविध व्हॉटसअप क्रमांकांद्वारे फिर्यादीशी संपर्क साधला. त्यांनी स्वतःला शेअर मार्केट ब्रोकर असल्याचे भासवून ऑनलाईन ट्रेडिंग व आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेळोवेळी ८५ लाख २५ हजार रुपये ट्रान्सफर केले. संशयित आरोपींनी फिर्यादीला सुरुवातीला काही पैसे मिळवून देखील दिले. त्यावर फिर्यादीचा विश्वास बसला. त्यानंतर तो अधिक पैसे गुंतवत गेला, मात्र, त्यानंतर आरोपींनी कोणताही नफा न देता संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली.
Web Summary : A Nashik businessman was defrauded of ₹84.25 lakhs by cybercriminals promising high returns on share market investments. The fraudsters contacted the victim via WhatsApp, gained his trust, and then disappeared after receiving the funds.
Web Summary : नाशिक के एक व्यवसायी को शेयर बाजार में निवेश पर उच्च रिटर्न का वादा करके साइबर अपराधियों ने 84.25 लाख रुपये का चूना लगाया। धोखेबाजों ने व्हाट्सएप के माध्यम से पीड़ित से संपर्क किया, उसका विश्वास जीता और फिर धन प्राप्त करने के बाद गायब हो गए।