शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
8
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
9
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
10
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
11
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
12
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
13
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
14
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
15
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
16
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
17
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
18
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
19
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
20
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
Daily Top 2Weekly Top 5

चारशे वर्षे जुना नाशिकचा ‘शहाजहांनी ईदगाह’

By admin | Updated: September 12, 2016 19:08 IST

नवशिखांवर वसलेलं नाशिक शहर पुर्वी गुलशनाबाद म्हणून ओळखले जात होते. ऐतिहासिक, पौराणिक वारसा या शहराने आजही जपलेला आहे.

 अझहर शेख, आॅनलाईन लोकमत

नाशिक, दि. १२ - नवशिखांवर वसलेलं नाशिक शहर पुर्वी गुलशनाबाद म्हणून ओळखले जात होते. ऐतिहासिक, पौराणिक वारसा या शहराने आजही जपलेला आहे. गोदाघाट, तपोवन परिसरातील पुरातन मंदिरे आजही पौराणिक काळाची साक्ष देतात. तसेच गावठाण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या नाशकातील जुनी मंदिरे, मशिदी, दर्गाच्या वास्तू इतिहासाची आठवण करुन देतात. अशाच वास्तूंपैकी एक नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाला लागून असलेली ‘शहाजहांनी ईदगाह’ची वास्तू.

‘शहाजहांनी ईदगाह’ची वास्तू ही देखील ऐतिहासिक आहे. या वास्तूला अनन्यसाधारण महत्व असून वर्षातून दोनदा या ठिकाणी शहर व उपनगरांमधील मुस्लीम बांधव एकत्र येऊन सामुहिकरित्या नमाजपठण करतात. 

मुघलकालीन वास्तूंमध्ये या वास्तूचा समावेश होतो. शहरात मुघलकालीन काही मशिदी आहेत. त्यापैकी एक शहाजहांनी मशिद. इसवी सन १६११-१२च्या सुमारास मिर्झा शहाबुद्दीन बेग मुहम्मद खान उर्फ शहाजहांन हे गव्हर्नर असताना नाशिकमध्ये (तेव्हाचे गुलशनाबाद) दोन वर्षे मुक्कामी होते.

तेव्हा त्यांनी शहाजहांनी मशिद आणि शहाजहांनी ईदगाहची निर्मिती केली. या दोन्ही वास्तू सुमारे चारशे वर्षे जुन्या असून तेव्हापासून या ठिकाणी नमाजपठण केले जात असल्याची माहिती हाजी वसीम पिरजादा यांनी दिली. या वास्तुचे बांधकाम दगडी असून मुघल स्थापत्यकलेचे दर्शन बांधकामातून सहज घडते. वास्तुला मध्यभागी दोन लहान मनोरे (मिनार) आहे तर वास्तूच्या दोन्ही टोकांनाही दोन लहान मनोरे उभारण्यात आले आहेत.