शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

चार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

By admin | Updated: January 21, 2017 00:14 IST

कालिदासची दुरवस्था : आयुक्तांनी घेतली गंभीर दखल

नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिरातील दुरवस्थेबद्दल अभिनेता प्रशांत दामले यांनी महापालिकेचे वाभाडे काढल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी त्याची गंभीर दखल घेत चार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, कालिदासच्या दुरुस्तीची कामे सध्या सुरू असून, दामले यांनी फेसबुकवर टाकलेली छायाचित्रे ही जुनी असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. महाकवी कालिदास कलामंदिरातील दुरवस्थेबद्दलची काही छायाचित्रे अभिनेता प्रशांत दामले यांनी फेसबुकवर शेअर करत नाराजी व्यक्त केली होती. दामले यांच्या पोस्टवरून सोशल मीडियात असंख्य प्रतिक्रिया उमटल्या आणि अनेकांनी महापालिकेला दूषणे दिली. दरम्यान, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दामले यांच्या या नाराजीची दखल
घेत कालिदासच्या दुरवस्थेबद्दल अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे  अधीक्षक अभियंता उत्तम पवार, सहायक आयुक्त मालिनी शिरसाट आणि आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आणि येत्या आठ दिवसांत त्यावर खुलासा करण्याचे आदेश काढले. कालिदासबद्दल असलेल्या तक्रारींबद्दल पत्रकारांशी बोलताना आयुक्त कृष्ण यांनी सांगितले, कालिदास कलामंदिरात गेल्या काही दिवसांपासून दुरुस्तीचे काम सुरू आहे. खुर्च्या बदलण्याचे काम चालू असल्याने काही जुन्या तुटलेल्या खुर्च्या बाजूला ठेवल्या जातात. त्यामुळे त्याची छायाचित्रे टाकून दुरवस्था झाल्याचे भासविले गेले. आचारसंहितेनंतर कालिदासच्या नूतनीकरणाच्या कामाला आणखी गती येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
संकल्पचित्रही हायजॅक
दामले यांनी कालिदासच्या दुरवस्थेची छायाचित्रे फेसबुकवर टाकल्यानंतर मनसेने त्यावर प्रतिक्रिया देत दामले यांच्यावरच हल्लाबोल केला. शिवाय, कालिदास कलामंदिरचे संकल्पचित्र तयार असल्याचे सांगत त्याबाबतची छायाचित्रेही सोशल मीडियावर फिरत आहेत. दरम्यान, आयुक्तांनी वास्तुविशारद धीरज पाटील यांनी तयार केलेल्या संकल्पचित्रांची माहिती पत्रकारांना दिली. त्यावेळी सदर संकल्पचित्रे ही अगोदरच सोशल मीडियावर फिरत असल्याचे आयुक्तांसह पाटील यांच्या निदर्शनास पत्रकारांनी आणून दिल्यानंतर दोहोंना आश्चर्याचा धक्का बसला.