गाय-गोऱ्हांसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त

By Admin | Updated: December 30, 2016 00:15 IST2016-12-30T00:15:41+5:302016-12-30T00:15:52+5:30

गाय-गोऱ्हांसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त

Four lakhs of money and crores of money seized | गाय-गोऱ्हांसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त

गाय-गोऱ्हांसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : बेकायदेशीरपणे गाय-गोऱ्हांची चोरटी वाहतूक करणाऱ्या एकूण पाच संशयितांना भद्रकाली, मुंबईनाका पोलिसांनी दोन ठिकाणांवरून अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा गोऱ्हे, दोन बैल, गायीची सुटका केली आहे.
पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार द्वारका सर्कलवर सापळा रचून संशयास्पद टेम्पो (एम एच १७ सी ६६३२) अडविला. टेम्पोचालक बाळू मच्छिंद्र साळवे (२२, रा. कलानगर) याची कसून चौकशी केली असता त्याने टेम्पोमध्ये दहा गोऱ्हे व बैल असल्याची माहिती दिली. या जनावरांची विक्री करण्यासाठी साळवे आल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पोसह एक लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. संशयित अजहर निसार शेख (२६, रा.भारतनगर) व शौकत (पूर्ण नाव माहीत नाही) याप्रकरणी शेखविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Four lakhs of money and crores of money seized