देवपूर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्रेहमेळावा

By Admin | Updated: November 12, 2016 23:01 IST2016-11-12T23:01:26+5:302016-11-12T23:01:12+5:30

देवपूर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्रेहमेळावा

Former student of Deobhpur school | देवपूर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्रेहमेळावा

देवपूर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्रेहमेळावा

 देवपूर : सिन्नर तालुक्यातील देवपूर येथील हायस्कूलमध्ये २००८ला दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्रेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. आठ वर्षांनी एकत्र आलेले माजी विद्यार्थी काही तासांपुरते का होईना पुन्हा शालेय जीवनात रमले.
मोठ्यांचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण केल्यास जीवनात नेहमीच यशाला गवसणी घालता येईल. विद्यार्थ्यांनी चांगले आचरण करावे, विद्यालयाच्या सतत संपर्कात राहावे, असे आवाहन माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे संचालक विजय गडाख यांनी यावेळी केले. व्यासपीठावर प्राचार्य सुनील गडाख, विजय माळोदे, रवींद्र गडाख, शौकत जहागीरदार आदि उपस्थित होते.
दातृत्वाची भावना देश, शाळा, समाज घडवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे त्यातून युवाशक्ती उभी राहील अशी अपेक्षा प्राचार्य सुनील गडाख
यांनी व्यक्त के ली. पल्लवी गडाख, प्रशांत रहाणे, सोमनाथ जगताप, रामनाथ काळे या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून
शालेय आठवणींना उजाळा देत विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त
केली. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने साडे पाच हजार रुपये किमतीचे क्रीडा साहित्य विद्यालयास भेट देण्यात आले.
सागर गडाख, शाहरुख मणियार, चेतन पगार, शांताराम इलग, विकास नरोडे, अमोल गडाख विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Former student of Deobhpur school