शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री भुजबळांची हिरे यांनी घेतली भेट

By admin | Updated: March 30, 2017 23:55 IST

मालेगाव : गेल्या पंधरा वर्षांपासून माजी मंत्री छगन भुजबळ व प्रशांत हिरे यांच्या घराण्यातील वाद संपुष्टात आले आहेत.

 मालेगाव : गेल्या पंधरा वर्षांपासून माजी मंत्री छगन भुजबळ व प्रशांत हिरे यांच्या घराण्यातील वाद संपुष्टात आले आहेत. जिल्हा बँकेचे माजी चेअरमन अद्वय हिरे यांनी माजी मंत्री भुजबळ यांची मुंबई येथे भेट घेतल्यामुळे मैत्रीपूर्व संबंध प्रस्थापित झाल्याचे सिद्ध झाले आहे. नांदगाव व मालेगाव तालुक्याच्या राजकारणात याचे राजकीय पडसाद दिसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.मालेगाव पंचायत समिती सभापती निवडणुकीच्या वेळेसच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजीमंत्री भुजबळ यांच्या सल्ल्यानुसार भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या सत्तेचा वारू रोखण्यासाठी भाजपाचे अद्वय हिरे यांनी माजीमंत्री छगन भुजबळ यांच्याशी जमवून घेतले. त्यानंतर पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिभा सूर्यवंशी यांची वर्णी लागली. शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यात भाजपाला यश आले. या यशातच भुजबळ व हिरेंची दिलजमाई झाल्याचे उघडकीस आले होते; मात्र अद्वय हिरे यांनी तब्बल ७ वर्षानंतर मुंबई येथील न्यायालयात भुजबळ यांची भेट घेऊन अर्धातास चर्चा केली. गेल्या पंधरा वर्षापूर्वी कळवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेला माजी मंत्री भुजबळ उपस्थित राहू न शकल्यामुळे हिरे समर्थक नाराज झाले होते. तेव्हापासूनच भुजबळ व हिरे गटामध्ये वाद होत होते. या वादामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्रास होत होता. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुना वाद मिटवून एकत्र रणनीती आखण्याचे निर्णय भेटीत ठरल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हिरे व भुजबळांचे राजकीय पक्ष सध्या वेगवेगळे आहेत. भविष्यात सत्तेच्या राजकारणासाठी पक्षविरहीत मैत्रीपूर्ण संबंधातून एकत्र येऊ असे भेटीत ठरले असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)