शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवबंधनात?

By admin | Updated: January 20, 2017 00:49 IST

दळवट येथे गुफ्तगू : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी दिला दुजोरा

 नाशिक : नव्वदच्या दशकामध्ये जिल्हा परिषदेची सत्ता स्वबळावर मिळविणाऱ्या शिवसेनेने पुन्हा त्यासाठी कंबर कसून प्रयत्न सुरू केले असून, याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी महिला अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य असलेले त्यांचे पती यांना आपल्या पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. त्याबाबत कळवण तालुक्यातील दळवट येथे चर्चा झाल्याच्या वृत्तास शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी दुजोरा दिला आहे.केंद्रात व राज्यात भाजपाबरोबर शिवसेना सत्तेत असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याच्या हालचाली आहेत. त्यात नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याच्या दृष्टीने व्यूहरचना केली जात असून, जिल्ह्यातील अधिकाधिक मातब्बरांना पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षाला गळास लावण्याचे प्रयत्न केले जात आहे.जिल्हा परिषदेच्या या माजी अध्यक्षांचे श्वसूर हे काही वर्षांपूर्वी भाजपाचे आमदार तसेच मंत्रीही होते. या आधीही त्यांनी विविध पक्षांमध्ये प्रवेश केलेला आहे. शिवसेनेतील नेते व कार्यकर्त्यांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध असल्यामुळे त्याचा फायदाही या दांपत्याला होण्याची अपेक्षा आहे.(वार्ताहर)